Wednesday, 2 July 2025

✍️  *प्रा. डॉ. तारा भवाळकर समान मराठी साहित्याचे मदारी पंढरपुरच्या विठ्ठलामध्ये ही सरते शेवटी विष्णु - शिव - गणेश शोधतात !*

       *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य',* नागपूर १७

राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल 

एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु म.प्र.

बुध्द आंबेडकरी लेखक, कवि, समिक्षक, चिंतक 

मो.न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२


              नवी दिल्ली येथे झालेल्या *"९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०२५"* चे अध्यक्ष पद *प्रा. डॉ. तारा भवाळकर* ह्यांनी भुषविले होते. आजपर्यंत मराठी साहित्य संमेलनात किती महिलांनी अध्यक्षपद भूषविले आहेत ? असा गणितीय लेखाजोखा हा मांडला गेला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अध्यक्षपद भुषविणा-या *प्रा डॉ तारा भवाळकर* ह्या सहाव्या विदुषी झालेल्या आहेत. अभिनंदन *डॉ तारा भवाळकर !* परंतु साहित्य *समेलनाच्या अध्यक्षांनी किती तीर मारलेत ?* हा प्रश्न मात्र जश्याचा तसाच आहे. ह्या संदर्भात *"साहित्याचा उगम - वास्तव - अभिजात दर्जा"* ह्या विषयावर माझे बरेच लेख मिडियात प्रकाशित झालेले आहेत. मराठी भाषेचा उगम इतिहास *इसवी ७०५ सालचा* पुणे जवळील *"तळेगाव ढमढेरे शिलालेख"* साक्ष देतो आहे. दुसरा शिलालेख हा *इसवी १०१२ सालचा* रायगड जिल्हा अलिबाग तालुक्यातील *"अक्षी"* ह्या गावी सापडला. तिसरा शिलालेख *इसवी १०१८ सालचा* सोलापूर जिल्ह्यातील *"हत्तरसंग कुंडल"* हा आहे. चवथा शिलालेख *इसवी १०३९ सालचा* कर्नाटक राज्यातील *"श्रवणबेळ गोळ"* येथे सापडला. *"मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी २००० वर्षांचा इतिहास असणे गरजेचे होते."* अर्थात सन २०२५ साली मराठी भाषेला २००० वर्ष होत नसल्यामुळे सरते शेवटी *"मराठी साहित्यिक वर्ग"* ही बुध्दमय संस्कृतीच्या *"नाणेघाट शिलालेख"* हा आधार शोधायला निघालेत. आणि बुद्धमय संस्कृतीचा *"नाणेघाट शिलालेख"* आधार घेवुन *"मराठी भाषेला अभिजात दर्जा"* मिळविण्यासाठी ती यशस्वी झालेले आहेत. करीता मराठी साहित्यिक वर्गाचे अभिनंदन !!!

            मराठी शिलालेख संदर्भ ह्यासोबतचं मराठी भाषातज्ञ *विश्वनाथ खरे* ह्यांनी *"समंत सिध्दांत"* अनुसार मराठी भाषेचे खरे मुळ *"तामिळ भाषेतुन"* मानलेले आहे. ह्याशिवाय मराठी भाषातज्ञ *डॉ श्री. ल. कर्वे* ह्यांनी श्री खरे ह्यांच्या विधानाची पुष्टी केलेली आहे. *दुर्गा भागवत* हिने राजाराम शास्त्री ह्यांच्या संशोधन आधारे *"जुनी माहाराष्ट्री"* भाषा ही संस्कृत पेक्षा जुनी आणि खरी भाषा मानलेली आहे. परंतु संस्कृत भाषा ही कोणती ? कारण बुध्द संस्कृतीमध्ये इसवी पहिल्या शतकात *"पाली भाषेवर"* संस्कार करुन *"हिब्रु संस्कृत भाषेचा"* अविष्कार केला गेला. पाली भाषा सोबतचं हिब्रू संस्कृत भाषेची लिपी ही *"धम्म लिपी"* (ब्राम्ही लिपी) आहे. *"देवनागरी लिपीचा"* प्रथम प्रारुप *इसवी ११०० साल* असले तरी ती *इसवी १२९६ साली* व्यवहारात आली. मराठी भाषेची  तद्वतचं *"क्लासिकल संस्कृत भाषा"* हिची लिपी ही *"देवनागरी"* आहे. तेव्हा दुर्गा भागवत ही *"क्लासिकल संस्कृत"* संदर्भ देत आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे. *प्रा हरी नरके* हे मराठी भाषा ही *"इसवी सनाच्या पुर्वीपासुन अहिर माहाराष्ट्री - प्राचिन म-हाटी भाषेपासुन शौरसेनी भाषेची उत्पत्ती मानलेली आहे. आणि शौरसेनी भाषेपासून कालांतराने मागधी / पैशाची या दोन भाषेची उत्पत्ती"* हा अफलातून *"जावंई शोध"* लावलेला आहे. हरी नरके ह्यांनी मराठी भाषेची *"मुळ लिपी"* कोणती ? हे सुध्दा सांगुन द्यायला हवे. मराठी भाषेची *"मुख्य मराठी / अहिराणी मराठी / मालवणी मराठी / कोल्हापूरी मराठी / व-हाडी मराठी "* असे पोट प्रकार दिसुन येतात.

           ब्राह्मण्य मराठी साहित्य धारेचा इतिहास हा तसा तर पुर्णतः *"फसवा इतिहास* आहे. आता मी अन्य भाषा - साहित्य संदर्भात बोलत नाही. *"मराठी भाषा - साहित्य ह्याचा खरा उदगाता कोण ?"* हा विवादाचा भाग आहे. परंतु मराठी साहित्यिकांनी मराठी साहित्याचे *"अग्रणी कवि"* म्हणून १२ व्या शतकातील *मुकुंदराज / संत ज्ञानेश्वर महाराज* (१२/०८/२/१२७५ ते २/१२/१२९६) ह्यांचा उदो उदो केलेला आहे. शिंपी समाजाचे *संत नामदेव महाराज* (२६/१०/१२७० ते ३/०७/१३५०), संत नामदेव महाराज परिवारातील *संत जनाबाई* (१२५८ ते १३५०), महार समाजाचे *संत चोखामेळा* (१२७३ ते १३३८) ह्या वयाने ज्येष्ठ असलेल्या मराठी संतांना *"अग्रणी कवि"* म्हणुन स्थान देण्यात आले नाही. हा जन्म इतिहास समजून घेणे फार गरजेचे आहे. त्यांसोबतचं सोनार जातीचे *नरहरी सोनार* (११९३ ते १३१३), चोखामेळा परिवारातील *संत सोयराबाई / संत निर्मळाबाई / संत कर्ममेळा* / ब्राह्मण जातीचे *संत एकनाथ महाराज* (१५३३ ते १५९९), वाणी जातीचे *संत तुकाराम महाराज* (२१/०१/१६०८ ते १९/०३/१६५० (१६८८) ही तमाम संत *"पंढरपूरच्या विठोबा / बुध्दाला"* शरण गेल्यामुळे दुर्लक्षित झालेली आहेत. ब्राह्मण जातीचे *संत रामदास स्वामी*(१६०६ ते १६८२) ह्यांचा मात्र उदोउदो करुन *छत्रपती शिवाजी महाराज* ह्यांचे गुरु असल्याचा फसवा इतिहास रचला गेला. वास्तविकत: *छत्रपती शिवाजी महाराज* ह्यांचे गुरु *संत तुकाराम महाराज* होते. छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या शिवनेरी किल्ल्याच्या शेजारी *"बुध्द लेणी"* ह्या कोरलेल्या आहेत. बुध्दाला शरण गेलेल्या ह्या तमाम संतांच्या मराठी अभगांचा अभ्यास होणे / संशोधन होणे गरजेचे आहे.

             *प्रा. डॉ. तारा भवाळकर* ही मराठी साहित्यिक पंढरपुरच्या विठोबात *"वैष्णव / शिव / गणेश रुपे"* सांगित आहे. पंढरपूरच्या विठोबाच्या *"दगडी मुर्तीतुन प्राण काढल्याचा विधी "* ती आपल्याला मिडिया मुलाखतीत सांगित आहे. दगडातुन प्राण काढल्यानंतर तो प्राण घागरीत ठेवल्यावर *"घागरी विठोबा"* हा सुध्दा संदर्भ देत आहे. *"दगडामध्ये काय प्राण वास असतो ?"* पंढरपूर विठोबाची मुर्ती ही मुळ मुर्ती नाही. पंढरपुर विठाबाची मुर्तींचे आक्रांत वेळी स्थानातरण करण्यात आले. वगैरे वगैरे. तारा भवाळकर ही मिडिया मुलाखतीत अजुन खुप काही सांगुन गेली. अजुन ब-याच काही मान्यवरांच्या मतांमध्ये ही विरोधाभास आहे.  खरे तर, दगडी मुर्तीचा अविष्कार ही प्राचीन कला बुध्द संस्कृतीची *"गांधार कला / मथुरा कला"* ही साक्ष आहे. तसे बघावे तर *डॉ तारा भवाळकर* हिच्या दगडी मेंदुचा प्रमाण हा परिचय आहे. *संत नामदेव महाराज* हे त्यांच्या अभंगांत म्हणतात - *"मध्ये झाले मौन देव निज घ्यावी | बौध्द ते म्हणोनी नावे रुप ||"*  वरिष्ठ संत *जनाबाई* म्हणते - *"होवुनिया कृष्ण कंस वधियेला | आता बुद्ध झाला सखा माझा ||"* (३४४) दुस-या अभंगात ती म्हणते - *"गोकुळ अवतारु | सोळा सहस्त्रावरु | आपण योगेश्वरु | बौध्द रुपी |"* (१०५३) तिस-या अभंगात ती म्हणते - *"व्रत भंगासाठी बौध्द अवतार | झाला दिगंबर अवनीये |"* (१०९६) चवथ्या अभंगात ती म्हणते - *"ऐसा कष्ठी होऊनी बौध्द राहिलासी |"* (१०९८) अग्रणी संत *चोखामेळा महाराज* म्हणतात - *"चोखा चोखत निर्मळ | तया अंगी नाही मळ | चोखा चोखाचा सागर | चोखा भक्तीची माऊली |"* संत चोखामेळा परिवारातील *संत सोयराबाई* म्हणते - *".... देह असुनही तू ही देही | सदा समाधीस्त राही | पाहाते पाहणे गेले दुरी | मने चोखियाची महारी |"* ब्राम्हण जातीचे संत *एकनाथ महाराज* म्हणतात - *"नवबा बैसे स्थिररुप | तया नाम बौध्दरुप | संत तया दारी | तिष्ठाताति निरंतरी |"* जगद्गुरु *संत तुकाराम महाराज* हे त्यांच्या अभंगांत म्हणतात - *"बौध्द अवतार माझिया अदृष्टा | मौर्य मुखे निष्ठा धरियेली |"* दुस-या अभंगात ते म्हणतात - *"नावे रुपे अंगी लावला विटाळ | होते ते निर्मळ शुद्ध बुद्ध |"* अजुन संतांचे बुध्द संदर्भात खुप काही अभंग आहेत‌. *बाबासाहेब डॉ आंबेडकर* ह्यांनी पंढरपूरचा विठ्ठल हे बुध्दचं असल्याचे म्हटलेले आहे. *"पुंडलिक > पुंडरिक > कमळ."* आणि कमळ हे बुध्द धर्मात महत्वाचे मानलेले आहे. आता शब्द मर्यादेमुळे हा विषय आटोपता घेणे आवश्यक आहे.

             भाषा लिपीचा बोध ही *"सिंधु घाटी सभ्यता"* (इ. पु. ३३०० ते १९००) ही देत असली तरी ती लिपी आजपर्यंत समजली / उमगली गेलेली नाही. त्यांनतर सिंधु घाटी सदृश्य लिपी - *"धम्म लिपी"* (ब्राम्ही लिपी) ही इ.पु. सातव्या - सहाव्या शतकात - *"बुध्द कालखंडात"* उदयास आली. बोली भाषा ही *"पाली - प्राकृत भाषा"* होती. आणि *"बुध्द साहित्याचा अविष्कार झालेला आहे."* ह्याशिवाय *"स्त्री साहित्याचा उगम"* ही बुद्ध धम्माची देण आहे. इसवी पहिल्या शतकात (हिनयान - महायान संप्रदाय विभाजन) पाली भाषेवर संस्कार होवुन *"हिब्रू संस्कृत भाषा"* जन्माला आली. हिब्रू संस्कृत भाषेची लिपी ही *"धम्म लिपी"* ( ब्राम्ही लिपी) होती. हिब्रु संस्कृत भाषा नंतर इसवी पाचव्या शतकात *"अपभ्रंश भाषा"* उदयास आली. इतकेच नाही तर *"शंख लिपी"* आणि अन्य काही लिपीचा ही अविष्कार झालेला होता. इसवी दहाव्या शतकात *"पाली प्राकृत ह्या भाषेची अंतिम अपभ्रंश अवस्था म्हणजे आदि हिंदीचा जन्म झाला."* महत्वाचे म्हणजे *"वैदिक धर्म / ब्राम्हण धर्म"* उदय हा *दहाव्या शतकानंतर* दिसुन येतो. बुध्द कालखंडात *"बम्हण"* हा शब्द प्रयोग *"विद्वान / श्रमण / समण"* ह्या अर्थाने केला जात असे. *"ब्राह्मण धर्म"* नाही. इसवी ११०० ह्या कालखंडामध्ये *"देवनागरी लिपीचे"* प्रारुप तयार होवुन इसवी १७९६ ला देवनागरी लिपी व्यवहारात आली. इसवी १६४५ ह्या कालखंडात *"उर्दु भाषा"* ही उदयास आली. इसवी १८ व्या शतकात *"आदि हिंदी"* भाषा नंतर *"आधुनिक हिंदी"* ह्या भाषेचा अविष्कार झाला. मराठी भाषा उगम उत्तरेकडुन (सातपुडा रांगा पासुन कावेरीच्या पश्चिमेकडे आणि उत्तरेस दमणपासुन दक्षिणेकडे गोव्यापर्यंत विस्तारीत गेल्याचा काही संदर्भ आहे. परंतु *"शिलालेख प्रमाण"* हे इसवी ७०५ पासुनचं दिसुन येतात. एकंदरीत *"लिपी - भाषा - साहित्य उगम"* ही बुद्ध धम्माची देण आहे. *"मुर्ती कला - शिल्प कला"* ही सुध्दा बुद्ध धर्माची देणं आहे. परंतु *तारा भवाळकर* समान मंद बुध्दीचे सा‌हित्यिक वर्ग *"लिपी / भाषा / साहित्य / कला उगम - वास्तव समजून घेत नसतील"* तर त्याला आपण काय म्हणावे ??? हाच संदर्भ मग तो *"पंढरपूरचा विठोबा / तिरुपतीचा बालाजी"* ह्यांना ही लागु आहे !!! 


-----------------------------------------

▪️ *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*

       नागपूर दिनांक २ जुलै २०२५

No comments:

Post a Comment