Wednesday, 23 July 2025

 ✍️ *आई रमाई ....!*

        *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*

        मो. न. ९३७०९८४१३८


आई रमाई 

प्रेम वात्सल्य पालतांना

मैत्रीचा प्रेमळ झरा 

ओठावर निरंतर ठेवुन

प्रज्ञा सुर्याची सोबत

फार अल्पशी असतांनाही

कमळ कोमलतेने

नेहमी जपणुक करीत होतीस....

भीम बाबांच्या

विदेशातील शिक्षणात

हातभार लावतांना

गोव-या वेचने असो

कमीपणा न बाळगता

पैशाची तजवीज करणे 

हे सर्व काही करतांना

अर्ध उपाशी राहातं होतीस....

भीम बाबांचे

विदेशात शिक्षण घेतांना

रमेश बाळ दगावले तरी

अभ्यासात व्यत्यय नको

ही बातमी लपवितांना

तुझ्या कोमल हृदयाला

कश्या वेदना झाल्या असतीलं

ही कल्पनांच असह्य होते माते...

राजरत्न बाळ मृत्युमुळे 

परिवार व्याकुळ मनाने

ग्रस्त असतांनाही

भीम बाबांच्या खिश्यात

कफनाला पैसे नाहीत

हे तु जाणुन घेतांना

लुगड्याचा पदर फाडुन 

कफनाची व्यवस्था केलीस माते....

भीम बाबांचे 

विदेशी शिक्षण पदवीमुळे 

सत्काराच्या आयोजनात

नविन लुगडे नसल्याने

बाबांना काही बहाना करुन

सोबतीला तु न जाता 

शाहु महाराजाची शाल पांघरून

दुरुनचं सत्कार बघत होतीसं माते...

प्रज्ञा सुर्याचा प्रकाश

हा निरंतर समाजाच्या

आणि भारत देशाच्या 

स्वातंत्र्य लढ्यावर

लक्ष केंद्रित करतांना

सामाजिक - आर्थिक समता

राजकिय समता शोधतांना

सोबत हात देत होतीस तु माते....

आई रमाई 

हे तु सर्व काही करतांना 

आपल्या प्रकृतीला न जपता

फक्त भीम बाबाकडे लक्ष देतांना

पंढरपूर जाण्याची तुझी इच्छा

बाबांनी मनाई केल्यावर 

तु कुठलाचं हट्ट न करता 

आई रमाई तु झिजत होतीसं ....

राजगृहाचे सुख

तुझ्या आजारी मनाने

कधीचं उपभोग न घेता

भीम बाबांना तुझ्या वेदना

तु कधीचं न सांगता 

एकटीनेचं मृत्यू संघर्ष करीत

बाबांना पारखे करतांना

तु सर्वांना सोडून गेलीस माते ....


---------------------------------

▪️ *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*

        नागपूर दिनांक २२ जुलै २०२५

No comments:

Post a Comment