🌹 *ह्या साक्ष जीवनाची !!!*
*डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*
मो. न. ९३७०९८४१३८
ह्या विशाल वाळवंटात
निवडुंग फुल नजरेला येणे
क्वचितचं आढळणारा विषय
परंतु मनाला होणारी हर्षीता
ह्याला काही सीमा नसते
आणि ती सुखद हर्षीता
जीवनाला आकार देत असते
एका अनमोल आठवणीची
ती सहज विसरणारी नसते
हृदयाच्या कप्प्यात तिला भरतांना
ती रोज आठवणींची असते
निवडुंग फुल ...!!!
जीवनातील ह्या आठवणी
इतिहास भिंतीवर कोरतांना
प्राचीन इतिहास भींतीवर
हातात हात घालुन बसल्यावर
प्रेमाची ती जीवन सोबत
प्रेम संदर्भ शोधीत असते
विश्वास भावनेची
सत्य निष्ठा विचारधारेशी
प्रामाणिक अंतःकरणाची
विश्व शांतीची
बुध्द विहारातील प्रवेश
ती सुखद अनुभुती देत असते
ह्या साक्ष जीवनाची....!!!
-----------------------------------
नागपूर दिनांक ३१ जुलै २०२५
No comments:
Post a Comment