Thursday, 10 July 2025

✍️ *कवियित्री निर्मला जीवने हिची कविता आंबेडकरी बुध्द विचारांकडे घेवुन जाणारी !*
       *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य',* नागपूर १७
राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल 
एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु म.प्र.
बुध्द आंबेडकरी लेखक, कवि, समिक्षक, चिंतक 
मो. न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२

            कवियित्री निर्मला जीवने हिचा काही दिवसांपूर्वी मला फोन आला होता. आणि तिने मला *"नवा संकल्प"* हा कविता संग्रह / *"अजिंक्य नीर"* हे स्वकथन मला पोस्टाने पाठविले. मध्यंतरी ती घसरुन पडल्यामुळे तिला चालतांना त्रास होत असल्याचे पत्र सोबतचं पाठविले. निर्मला जीवने हिचा *"नवा संकल्प"* हा दुसरा काव्य संग्रह असुन *"दवंडी"* हा तिचा पहिला काव्यसंग्रह आहे. नवा संकल्प ह्या कविता संग्रहातील काही कविता ह्या *"ललित साहित्याचा"* बोध करुन जातात. आयु निर्मला जीवने हिने हे सत्य तिच्या साहित्य लिखाणात मान्य केलेले आहे . तिच्या कविता संग्रहातील संविधान संदर्भातील शब्द संविधानाचे मुल्य जोपासतांना दिसते. ती म्हणते - *"जगण्याचे तत्वज्ञान / सांगते संविधान / मूल्य नव्या क्रांतीचे / दिसते पानापान."* आणखी ती म्हणते - *"हाच करा रे संकल्प / करु नका रे अपमान / जगण्यासाठी आम्हा / वाचविणार संविधान."* माजी सनदी अधिकारी *इ. झेड. खोब्रागडे* ह्यांनी बुध्द - आंबेडकरी साहित्याला छेद देण्याकरिता *"संविधान साहित्य संमेलन"* ह्या नावाने साहित्यामध्ये भर देण्याचा अफलातुन प्रकार चालविला आहे. दीक्षाभूमी नागपूर येथे ८ - ९ जुन २०१९ रोजी सदर आयोजन केले होते. सदर साहित्य संमेलनाला मी स्वत: आणि माझी संघटना *"सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल"* द्वारा विरोध करुन मा. उच्च न्यायालयात याचिका क्र. ३९४०/२०२९ दाखल केली होती. माझ्या बाजुचे मा. सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकिल *एड. चेतन बैरवा / एड. बी.बी‌. रायपूरे* होते. उच्च न्यायालयाने सदर संमेलन हे माझ्या *"मुलभुत अधिकाराचे उल्लंघन करणारे नाही"* ह्या कारणांनी याचिका डिस्पोस्ड ऑफ केली. मी सदर याचिका माझ्या मुलभूत अधिकाराचे उल्लंघन झाल्यामुळे दाखल केलेली नव्हती. परंतु *न्या. रवी देशपांडे / न्या. विनय जोशी* ह्यांच्या संविधान ज्ञानाबद्दल काय बोलावे ? *"भारतीय संविधानाचा सन्मान करणे"* हे आपण सर्व भारतीयांचे कर्तव्य आहे. भारतीय संविधान हे मुलत: *"कायद्याचे पुस्तक"* (Legal Book) नाही. तर ते *"कायद्याचे दस्तावेज"* (Legal Documents) आहे. त्यामुळे  *"भारतीय संविधान"* हे *"साहित्य मुळींच नाही."* साहित्य हे घाणेरडे / अश्लिल ही असु शकते. साहित्य मान्य नसेल तर निषेध म्हणून *"जाळले ही जावु शकते."* इ झेड खोब्रागडे ह्यांच्या मुर्खपणामुळे नवी दिल्लीच्या जंतरमंतर स्थानात *"भारतीय संविधान जाळण्यात आले."* परंतु बिन-अकल माणसाला कोण ज्ञान सांगणार ? असो.
           निर्मला जीवने हिची *"क्रांतिदिन"* ही कविता क्रांती इतिहास अभावाची दिसुन येते. भारताचा क्रांती इतिहास हा वेगळा आहे. मग तो उठाव १८५७ चा कां असेनां ! भारतीय कांग्रेस - गांधी राजनीतिची अदुरदर्शिता ही *"भारताला स्वातंत्र ३ -४ वर्षे उशिरा"* होण्याला कारणीभूत झाला आहे. *"रयतेचा राजा शिवाजी महाराज"* ह्या कवितेचे संदर्भ बरे असले तरी छ. शिवाजी महाराजांचे शिलालेख *"संस्कृत ह्या भाषेतील"* आहेत, हे समजुन घेणे गरजेचे आहे. अर्थात ब्राह्मण्य प्रभावाचा बोध होतो.*"गुढी पाडवा"* हा कविता संदर्भ इतिहास ही निर्मला हिने जाणुन घेणे गरजेचे आहे. मग *"क्रांती"* ह्या कविता आशयातील १९४२ ची *"चले जाव क्रांती"* ही !  हा गांधी - कांग्रेसचा मोठा मुर्खपणा होता. *"द्वितीय महायुध्द "* कालखंड १९३९ - ४५ हा *"हिटलर - झारशाही विरुध्द"* सुरु होते. बाबासाहेब डॉ आंबेडकर ह्यांनी *"मित्र देश - इंग्लंड - अमेरिका - रशिया"* ह्यांना समर्थन दिलेले होते. *"महार रेजिमेंट"* युध्दात सक्रिय होती. बाबासाहेब डॉ आंबेडकर ह्यांना कांग्रेस मंडळी ही गद्दार म्हणत होती. कांग्रेस ही *झुरी राष्ट्र - हिटलर* सोबत सख्य करावे की *"मित्र राष्ट्र"* ह्या द्वंद्वात अडकली होती. आणि उशिराने गांधी - कांग्रेसने मित्र राष्ट्राला पाठिंबा दिला. हा इतिहास समजून घेणे गरजेचे आहे. वरुन त्या कविता ललित साहित्याचा बोध करुन देण्या-या आहेत. *"जी़वाचा मापदंड"* ह्या कवितेत ती म्हणते - *"मापदंड जीवाचा / अनुसरा मार्ग विशुध्द / पंचशील तत्व / ही शिकवण देती बुध्द."* अगदी साध्या - सोप्या भाषेत ती बुद्ध सांगुन जाते. *"प्रियदर्शी सम्राट अशोक"* संदर्भ सांगताना ती राजमुद्रा विषयावर लिहिते - *"चार सिंहाची प्रतिमा / मुद्रा आहे भारताची / असा हा राजा सर्वोत्तम / सर्वश्रेष्ठ शान या देशाची."* निर्मला जीवने हिच्या प्रत्येक कवितेची समिक्षा करण्यास शब्दबंधन मर्यादा आहे. नया संकल्प ह्या कविता संग्रहाचे प्रकाशन समिक्षा प्रकाशन पंढरपूर ह्यांनी केले असुन ही पहिलीच आवृत्ती आहे.  कवियित्रीचा प्रयास उत्तम असला तरी तिने *"ललित साहित्य"* ह्या विचारातुन बाहेर पडायला हवे. बुध्द आंबेडकरी साहित्यातील *"सौंदर्यशास्त्र / मानवशास्त्र / नैतिकशास्त्र / प्रेम / स्त्री भाव"* इत्यादी आशयाची मांडणी नव्या स्वरूपात करायला हवे. पुर्व पार चालत आलेल्या साहित्य लिखाणातुन बाहेर पडुन तिने *"स्वतःचे लिखाण अस्तित्व"* निर्माण करायला हवे. निर्मला जीवने हिच्या भावी लिखाणाला माझ्या मंगल कामना आहेत.

----------------------------------------
✍️ *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*
        नागपूर दिनांक ९ जुलै २०२५

No comments:

Post a Comment