Tuesday, 8 July 2025

 🫀 *वेदनांचे काळीज ...!*

       *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*

       मो. न. ९३७०९८४१३८


वेदनांचे काळीज

दु:खाचे डोंगर

ह्या उराशी बाळगुन

माणुस हा जगत असतो

खचलेला ही असतों

जीवन सत्य शोधतांना

मग महाकारुणीक बुध्द

सहज बोध करुन जातो

चार आर्यसत्य

आर्य अष्टांगिक मार्ग

बुध्द पंचशील 

शुण्यवाद सिध्दांत 

प्रतित्यसमुत्पाद 

कारणकार्यभाव सिध्दांत

कारणा असेल तर

कार्य हे घडत असते

कारण नसेल तर

कार्य घडुनचं येत नाही 

आणि बरेचं काही बुध्द विचार ....

माणुस हा सावध होतो

प्रज्ञा ही जागृत होते

आशेचे एक किरण

सुर्य - चंद्रात बघत असतो

निसर्ग जगातील सौंदर्य 

हिरवीगार वनराई

विविध रंगी फुल झाडे

उंच उंच वृक्ष - शुध्द हवा

जंगल - पहाड वगैरे वगैरे

नागमोडी वळण रस्ते

आणि कारचा हा प्रवास

मित्रांची ती सोबत

विसरलेली मानवी करुणा

पुनश्च मनाला चेतवीत असते

असत्य - धोकेदारी ह्या जगात ....

इतिहासाची प्राचीन भिंंत

ती समोर नजरेला येते

ती बोलकी झालेली असते 

प्राचिन बुद्ध काळ इतिहास 

ती कथन करीत असते

बाजुलाच उभ्या असलेल्या 

सांची स्वरुप बुध्द विहारात 

प्रवेश करीत असतांना

शांतीचा सहज बोध होतो

बुध्दा समोर हात जोडून 

बुध्द वंदना केल्यावर 

शांत मनाने तो बाहेर पडतो

एका सत्य युगात

आपले एक उद्दीष्ट समोरा ठेवुन ....


----------------------------------

नागपूर दिनांक ६ जुलै २०२५

No comments:

Post a Comment