👌 *नको छेडु रे ती तार ...!*
*डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*
मो. न ९३७०९८४१३८
नको छेडु रे ती तार ही राष्ट्र द्वेषाची
बुध्दाची आवाम ही खुप चेतली आहे...
शोषण बखार ही तया इतिहासाची
हे अंधारी काजवे जागे झाली आहे
वस्त्र उतारविणा-या त्या विकृतीची
पाय छाटण्यास तयारी झाली आहे...
निरक्षरे होती माणसे त्या अभावाची
फुले परिवाराने ती क्रांती केली आहे
भीम बाबांने ह्या प्रज्ञा बुद्ध विचाराची
संविधाना द्वारा ती लाट आणली आहे...
ब्राम्ही लिपी अन ह्या पाली भाषेची
सिंधु सभ्यता बुध्द ज्योत आली आहे
हे अर्थ रुपातील उज्वल विकासाची
अशोका राजाने ती क्रांती केली आहे...
-----------------------------------
नागपूर दिनांक २७ जुलै २०२५
No comments:
Post a Comment