😥 *तुझ्या ह्या दु:ख सागरात...!*
*डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*
मो. न. ९३७०९८४१३८
तुझ्या ह्या दु:ख सागरात मला साथ घे नां
बुध्द भीमाच्या परिवारात मला साद दे नां...
माणसांच्या मनाची इथे वात्रटे झाली नां
धावुन ती कधी येतील ना सांगता येई नां
विविध गुटांच्या मागे ती बटिक झाली नां
मन एकीची ही भाषा ना स्वप्नात दिसे नां...
ह्या प्रेमाची चादर ऋतुत मैली झाली नां
सर्व काही अस्ताला गेले शोक आहे नां
हे मनाची करुणा ही क्षीण होता पहा नां
शीतल चंद्राची किरण ना शोधी दिसे ना...
निसर्ग संग मनाचा धागा सुखाचा आहे नां
फुलांचे प्रेम झाडांची मैत्री सोबत आहे नां
हे अजुन ह्या माणसाला काय हवे सांग नां
बंधुत्वाची प्रज्ञा आता बदलावी लागली नां...
----------------------------------------
नागपूर दिनांक २५ जुलै २०२५
No comments:
Post a Comment