Friday, 4 July 2025

 🤝 *जागतिक रिपब्लिकन महिला परिषद २०२५ : रिपब्लिकन जागतिक (???) किंवा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंदोरा ? रिपब्लिकन विचार राजकिय आकलन !*

        *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'* नागपूर १७

राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल 

एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु म. प्र.

मो. न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२

  

             रिपब्लिकन पक्ष आहे की विचार (?) आणि आयोजक वर्गांनी *"जागतिक रिपब्लिकन महिला परिषद २०२५"* समारोहाचे आयोजन शनिवार ५ जुलै २०२५ रोजी *"डॉ बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटर"* नागपूर ह्या ठिकाणी आयोजित केल्याची एक मोठी बातमी मिडियामध्ये दिसुन आली. सोबतचं रिपाई माजी राष्ट्रीय अध्यक्ष *"बॅरी‌. राजाभाऊ खोब्रागडे जन्म महोत्सव"* संदर्भ हा दिला गेला. जागतिक संदर्भ ह्या सम्मेलनाला दिसल्यामुळे *"अमेरिकेतील आजच्या सत्तारूढ असलेल्या रिपब्लिकन पार्टीचे नेते डोनाल्ड ट्रम्प"* ह्यांच्या सोबत काही समन्वय आहे काय ? हा अहं विचार मनात आला. अमेरिका ह्या देशात *"रिपब्लिकन पक्ष / डेमोक्रॅटिक पक्ष"* ह्या दोन पक्षांची उलट पालट *"युनायटेड स्टेट्स कांग्रेसवर"* नियंत्रण राहिलेले आहे. अर्थात सत्ता असते. रिपब्लिकन (?) आयोजकांनी सदर संदर्भातुन *"जागतिक रिपब्लिकन महिला परिषद २०२५ "* आयोजन केले असल्यास समस्त आयोजकांचे अभिनंदन करायला हवे ! परंतु *"रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया"* हा राजकीय संदर्भ *बाबासाहेब डॉ आंबेडकरांनी* कां दिला आहे ? हे समजून घेणे गरजेचे आहे. १५ ऑगस्ट १९३६ ला स्थापन *"स्वतंत्र मजूर पक्ष"* (Independent Labour Party) हा सन १९४२ साली बाबासाहेब डॉ आंबेडकरांना कां बरखास्त करावा लागला ? ही माहिती किती रिपब्लिकानां माहित आहे हा महत्त्वाचा विषय आहे. सन  १७-२० जुलै१९४२ साली नागपुरात बाबासाहेबांनी *"शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची"* स्थापन करुन राजकीय निवडणूक लढविली होती. नंतर १९५६ साली *"रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया"* ही राजकीय संकल्पना देवुन बाबासाहेब डॉ आंबेडकर हे आम्हाला सोडुन गेले. परंतु बाबासाहेबांचे नातु *एड. प्रकाश आंबेडकर* ह्यानी तर रिपब्लिकन विचारांची नाळ तोडुन *"बहुजन महासंघ ते वंचित आघाडी"* असा राजकीय प्रवास केलेला आहे, त्याला आम्ही काय म्हणावे ? प्रकाश आंबेडकर ह्यांना ४० - ५० वर्षापुर्वी *डॉ आनंद जीवने*'ह्यांच्या अध्यक्षतेखाली सर्वप्रथम परिचीत करणे, ही *"आमची सर्वात मोठी चुक"* झालेली आहे. अश्या ह्या दुष्काळी राजकीय परिस्थितीत *"रिपब्लिकन पक्षाचे"* बिखरणे / रिपब्लिकन नावाने विविध रुपी *"आघाड्या"* तयार होणे / रिपब्लिकन नावाने *"जागतिक रिपब्लिकन"* नावाचा संदर्भ ही ??? हा विचार माणसाला चिंताग्रस्त करून जातो. डॉ बाबासाहेबांचा *"राजकीय वारसा - रिपब्लिकन विचार"*  हा केवळ जीवंत आहे. इंडिया असलेला राष्ट्रिय राजकीय पक्ष - *"रिपब्लिकन पार्टी ऑफ इंदोरा"* सुध्दा नाही. तो मृतप्राय झालेला आहे.

            बाबासाहेब डॉ आंबेडकर ह्यांचा प्रवास हा *"सामाजिक"* (बहिष्कृत हितकारणी सभा २० जुलै १९२४ / समता सैनिक दल १३ मार्च १९२७) ते *"राजकीय"* (इंडिपेंडंट लेबर पार्टी - १५ ऑगस्ट १९३६ / शेड्युल्ड कास्ट फेडरेशन १७ - २० जुलै १९४२) आणि नंतर *"धम्म विचार"* (भारतीय बौद्ध जनसंघ १९५१ / दि बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया ४ मे १९५५)  देवुन १४ ऑक्टोबर १९५६ रोजी जगाला *"बुद्ध"* दिला. महान *"चक्रवर्ती सम्राट अशोक"* ह्यांच्या नंतर बुध्द धम्माचे पुन: उत्थान करणारे *"महानायक"* झाले आहेत. आणि भारतीय राजकारणात सफल योध्दा झाले. तर *मोहनदास गांधी* ह्यांचा प्रवास प्रथम *"राजकारण"* (राष्ट्रिय कांग्रेस) नंतर *"धर्मकारण - समाजकारण"* असा झालेला आहे. गांधींना सत्तारुढ जातीय सत्ता वलय असल्यामुळे ते टिकाव धरु शकले. *बाबासाहेबांना* असे वलय नव्हते. *"शुण्यातुन निर्माण झालेले"* ते नेते होते. *"द्वितीय महायुध्दातील"* डॉ बाबासाहेब आंबेडकर - गांधी कांग्रेस संघर्ष / डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे मित्र पक्ष - *"इंग्रजांना खुले समर्थन"* / गांधी - कांग्रेस ह्यांचे भरकटणे *"धुरी राष्ट्र - हिटलर"* वा मित्र राष्ट्र *"इंग्लंड"* ह्यापैकी कुणाला समर्थन द्यावे हे द्वंद्वत्व / बाबासाहेब डॉ आंबेडकर ह्यांना देशद्रोही म्हणने, बाबासाहेब डॉ आंबेडकर ह्या वैचारिक संघर्षातुन तावुन निघालेले होते. बाबासाहेब डॉ आंबेडकर ह्यांचा *"संघर्ष - त्याग - देशभक्ती - समाजाचे उत्थान - भारतीय संविधानतुन दिलेले अधिकार"* आम्ही किती समजुन / उमगुन घेतले ? हा प्रश्न रिपब्लिकन विचारकांनी समजून घेणे गरजेचे आहे. कारण आमची राष्ट्रिय नेते - कार्यकर्ते ही *"सत्ता तुकडे घास"* खाणारी झालेली आहेत. पाय लोटांगण करणारी / विविध नेत्यांचे थुका चाटणारी आहेत. रिपब्लिकन (???) नावाने *अशोक कोल्हटकर* आणि तमाम *"चाटु टीम"* ही त्यांचे ज्वलंत उदाहरण म्हणायला हवे नां ! अर्थात *"रिपब्लिकन विचारांचे कांग्रेसीकरण"* झाल्यास वावगे काय ? *रामदास आठवले / प्रा. जोगेंद्र कवाडे / एड. सुलेखा कुंभारे* ह्यांनी मग *"रिपब्लिकन विचारांचे भगवाकरण"* केल्यास मग पोटात दुखायला नको !!! कांग्रेसी आमदार / माजी मंत्री *डॉ. नितीन राऊत* हा सुध्दा रिपब्लिकन होवुन जातो. *"रिपब्लिकन शो"* हा असा चालु असतो. *"मेरा नाम जोकर"* फेम राज कपुर विचारानुसार *"दि शो मस्ट गो ऑन."* (The show must go on) ह्या रिपब्लिकन विचारांचे (?) अगदी तेचं सुरु आहे.  *"समाज जाये भाड में !!!!!"* उद्या रिपब्लिकन गुलामीचे पोवाडे गायिले जातील !!!

        जय बुद्ध ! जय भीम !! जय भारत !!! जय संविधान !!!!!

------------------------------------------

▪️ *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*

        नागपूर दिनांक ४ जुलै २०२५

No comments:

Post a Comment