Wednesday, 29 October 2025

 🌿 *आयुर्वेद शास्त्राचे खरे जनक — बुद्ध आहेत की धन्वंतरी ?* (एक संशोधन लेखन)   

    ✍️ *डॉ. मिलिंद जीवने ‘शाक्य’, नागपूर*

राष्ट्रीय अध्यक्ष, सिव्हिल राइट्स प्रोटेक्शन सेल

एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ. बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ, महू (म.प्र.)

माजी वैद्यकीय अधिकारी / हाऊस सर्जन

आंतरराष्ट्रीय परिषदेत  संशोधन पेपर परीक्षक

मो. न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२

मराठी अनुवाद : *एड. अनिल वैद्य* (भुतपुर्व न्यायाधीश)


          आमच्या विद्यार्थी जीवनात आम्हाला शिकवले जायचे की — आयुर्वेदाचे उद्गाता *"धन्वंतरी"* आहेत.  आणि धन्वंतरी हे *“विष्णूचे अवतार”* मानले जातात. तसेच आयुर्वेदाचा उगम *“समुद्र मंथन”* या पौराणिक कथेतून झाला, असे सांगितले गेले. पण माझ्या विद्यार्थी जीवनात मी वाचलेले एक ग्रंथ होते — *“भारताचे प्राणाचार्य”* त्या पुस्तकात आयुर्वेदाचे उद्गाता *“अवलोकितेश्वर”* (अर्थात – करुणेच्या दृष्टीने जग पाहणारा) असे नमूद केले होते. मी त्या काळात *“डॉ. आंबेडकर आयुर्वेदिक मेडिकोज असोसिएशन”* चा अध्यक्ष होतो. त्या असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्र पातळीवर निबंध स्पर्धा आयोजित केली जात असे आणि त्याला मोठा प्रतिसाद मिळत असे. नंतर मी त्या पारितोषिक प्राप्त निबंधांची *“अवलोकितेश्वर”* ही स्मारिका प्रकाशित केली. अलीकडेच मी *डॉ. राजेंद्र प्रसाद सिंह* यांचे *“बुद्ध हेच बैद्यनाथ (भैषज्यगुरु) आहेत”* हे व्याख्यान ऐकले आणि माझ्या त्या जुन्या आठवणी ताज्या झाल्यात.


🔹 *खोट्या इतिहासाची सर्जरी करणे आवश्यक -*

        आपल्या मनात शतकानुशतकांपासून खोटा इतिहासाचा कीडा घातला गेला आहे. तो केवळ संशोधन व्याख्यानांमुळे सहज जात नाही.

या मानसिक स्थितीला मी वैद्यकीय भाषेत *“मेंटल पॅरालिसिस”* म्हणेन.आता या खोट्या इतिहासावर *“इतिहास सर्जरी”* करण्याची वेळ आली आहे.


🔹 *धन्वंतरी की बुद्ध? दोन विरोधी परंपरा -*

        *“आयुर्वेदाचा उद्गाता धन्वंतरी”* आणि *“समुद्र मंथनातून त्याचा उगम”*— या दोन्ही कल्पना ब्राह्मणवादी ग्रंथांतून आलेल्या आहेत.

दुसरीकडे आयुर्वेदाला *“अथर्ववेदाचा उपवेद”* असे म्हटले जाते. जर तसे मानले, तर *"वेदांचा कालखंड इसवी सन ११वी ते १४वी शतक"* यामध्ये येतो. चार वेदांच्या पीठांची स्थापना —

1. *शृंगेरी पीठ* (यजुर्वेद – केरळ)

2. *शारदा पीठ* (सामवेद – गुजरात)

3. *ज्योतीर्मठ पीठ* (अथर्ववेद – उत्तराखंड)

4. *गोवर्धन पीठ* (ऋग्वेद – ओडिशा)

         हे सर्व वेद ग्रंथ *"कागदावर"* लिहिलेले आहेत, *"ताडपत्र, ताम्रपट किंवा शिलालेखावर नाहीत"* आणि कागदाचा शोध **चीनमध्ये इ.स. १०व्या शतकात"* लागला!


🔹 *वास्तविक ऐतिहासिक संदर्भ -*

      मानव इतिहास पाहिला तर — पाषाण युग, कांस्य युग, लोखंड युग या कालखंडात माणूस नग्न होता. मग सुवर्णाभूषित विष्णू-धन्वंतरी कसे काय अस्तित्वात असतील? हा प्रश्न महत्त्वाचा आहे.


🔹 *बुद्धांचा जन्म इ. पू. ६२३ (इपु ५६३ नव्हे) मध्ये झाला,* हे कार्बन डेटिंगद्वारे सिद्ध झाले आहे. त्या काळात *"वंशव्यवस्था"* अस्तित्वात होती — शाक्य, कोलिय, हर्यक, मौर्य इत्यादी. बुद्धकालीन *"भाषा पाली"* आणि *"लिपी ब्राह्मी लिपी"* होती. बुद्ध धर्म पहिल्या शतकात *"हिनयान-महायान"* संप्रदाय यामध्ये विभक्त झाला. महायानां संप्रदायानी *"पाली भाषेवर संस्कार करून हिब्रू-संस्कृत भाषेचा अविष्कार केला." इसवी ८५० या कालखंडात *शंकराचार्य* यांचा जन्म झाला.

ते **प्रच्छन्न बौद्ध** होते आणि नंतर त्यांनी *“चार पीठे”* स्थापून *"महायान बौद्ध विहारांवर"* अधिपत्य मिळवले.

याच काळात *"बौद्ध धर्माची अधोगती"* आणि *"वैदिक धर्म / ब्राह्मण धर्माचा"* (इसवी ११ - १४) उदय झाला.


🔹 *बुद्धकालीन विद्यापीठे आणि चिकित्सा विज्ञान -*

      ‌बुद्ध काळात *"तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला, पुष्पगिरी, वल्लभी, ओदंतपुरी"* अशी बौद्ध विद्यापीठे होती. या विद्यापीठांत *"वैद्यकशास्त्र, शल्यक्रिया, नर्सिंग, स्त्रीरोग, प्रसूतीशास्त्र, औषधनिर्मिती"* इत्यादींचे शिक्षण दिले जात असे. त्या काळातील *जीवक, बिंबिसार, अजातशत्रु, वसुबंधु* हे प्रसिद्ध विद्यार्थी होते. **बौद्ध विहारांमध्ये चिकित्सालये"* होती, याचे पुरावे चीनच्या कुचा प्रदेशातील *"बोअर पांडुलिपी”* मध्ये सापडतात.

त्या पांडुलिपीत चरक आणि सुश्रुत यांचा उल्लेख आहे.*सम्राट अशोक आणि कंबोडियाचा सम्राट जयवर्धन* यांनी अनेक चिकित्सालये आणि औषधालये स्थापन केली होती.


🔹 *बुद्ध – वैद्यनाथ किंवा भैषज्यगुरु -*

         *जपान, चीन आणि तिबेट या देशांमध्ये बुद्धांना Medicine Buddha (भैषज्यगुरु)* म्हणून पूजले जाते. *“The Buddha and His Dhamma” *या ग्रंथात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी *"बुद्धांच्या रुग्णसेवा कार्याचे"* सुंदर वर्णन केले आहे — अतिसाराने त्रस्त भिक्खूची सेवा स्वतः बुद्धांनी केली,

*स्थविर वक्कली, गृहपति नकुलपिता, महानाम, सप्रबुद्ध"* यांचा उपचार त्यांनी केला. हे सर्व दाखवते की बुद्ध हेच *"वैद्यांचे वैद्य – भैषज्यगुरु"* होते.*धन्वंतरी* ही कल्पना पौराणिक आणि दंतकथांवर आधारित आहे.


🔹 *आयुर्वेद नायकांचा ऐतिहासिक कालखंड*

         *आचार्य जीवक* – इ.पू. ५वे शतक. बिंबिसार आणि बुद्धांचे वैद्य. चिकित्सक तसेच शल्यचिकित्सक.*आचार्य वाग्भट* – इ.पू. ५वे शतक. अष्टांग संग्रह व अष्टांग हृदय ग्रंथांचे लेखक. *आचार्य सुश्रुत* – इ.पू. ७वे शतक. शल्य चिकित्साचे जनक मानले जातात, पण त्यांचा कालखंड वादग्रस्त. *आचार्य चरक* – इ.पू. १५०-२००. चरकसंहिताचे लेखक, सम्राट कनिष्काचे राजवैद्य. हे सर्व आचार्य बौद्ध धर्मीय होते. म्हणूनच आयुर्वेदाचा उगम *"बुद्धकालीन"* आहे, *"समुद्र मंथनातून"* नव्हे. बुद्धांचा करुणामय धम्म आणि **रुग्णसेवा हीच खरी आयुर्वेदाची पायाभूत तत्त्वे आहेत."* बुद्ध म्हणजेच भैषज्यगुरु – वैद्यनाथ. त्यांच्या शिकवणीतूनच वैद्यकशास्त्राचा विकास झाला.*धन्वंतरी* हा पात्र फक्त ब्राह्मण ग्रंथांनी निर्माण केलेला एक पौराणिक मिथक आहे.

*"बुद्ध हेच आयुर्वेदाचे खरे जनक आहेत"* — करुणेचे, विज्ञानाचे आणि मानवसेवेचे प्रतीक.

-------------------------------------

*✍️ डॉ. मिलिंद जीवने ‘शाक्य’*

नागपूर, २६ ऑक्टोबर २०२५

मराठी अनुवाद : *एड. अनिल वैद्य* (भुतंपुर्व न्यायाधीश)

No comments:

Post a Comment