👌 *बुद्ध विश्वासाला...!*
*डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य',* नागपूर
मो. न. ९३७०९८४१३८
बुध्द विश्वासाला अशोक हा दायाद झाला
माणसा विश्वासाला भीम हे समोरा आला...
हे अशोका काळातुन बुद्ध हा ज्ञात झाला
कलिंग युद्धाने शांतीला हा शिक्का आला
अशोका विजया दशमी आम्हा याद आला
जगाच्या पाठीवर बुध्दाचा तो नाद झाला...
बाबांच्या क्रांतीने धम्माचा तो साद झाला
धम्म चक्क पवत्तन आम्हा दिन याद आला
अशोका शिलालेखाने शब्दाला भाव आला
भीमाच्या कृतीतुन तो राष्ट्र प्रतिक झाला...
प्रेम मैत्री अहिंसा हा संदेश बुध्दाचा आला
करुणा बंधुता हा मंत्र जगी फिरता झाला
हे मानव कल्याणाचा तो एक धागा आला
अत्त दिपो भव ह्याने जगाचा उध्दार झाला...
-------------------------------------------
नागपूर दिनांक १४ आक्टोंबर २०२५
No comments:
Post a Comment