Saturday, 11 October 2025

  ✍️ *सरन्यायाधीश भुषण गवई हे पापी (?) आहेत ! ह्या सुषमा अंधारे लिखित व्यंगात्मक पत्रातील काही मुद्दामध्ये सुधार होणे गरजेचे आहे.* (सुषमाताईंना खुले पत्र)

         *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य',* नागपूर १७

राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल 

एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु मप्र 

आंतरराष्ट्रीय परिषदेचे संशोधन पेपर परिक्षक

मो. न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२


प्रिय सुषमाताई,

       आपण भारताचे *सरन्यायाधीश भुषण गवई* साहेब ह्यांना लिहिलेले *"व्यंगात्मक पत्र"* आज मी यु ट्युब वर वाचले. सदर पत्र वाचुन तसेचं प्रवक्ता स्वरुप व्यक्तीकडुन पत्र वदवुन केलेले आपले मनोगत कळले. सदर आपल्या लिहिलेल्या *"साहित्य व्यंगात्मक"* पत्राबद्दल आपले अभिनंदन मी निश्चितचं केले असते. परंतु सदर पत्रात आपण *"ब्राह्मण्य व्यवस्था"* ह्यावर आरोप करतांनाचं *"बुध्द - फुले - आंबेडकरी विचारवादी मान्यवर  - संघटना"* ह्यांच्यावर खुले आरोप केले आहेत. ही गोष्ट मला असह्य झाली. सदर घटना घडल्यावर माझा स्वतःचा *"हिंदी निषेध लेख"* हा मिडियात दिसुन येईल. शिवाय समस्त भारत देशातुन *"सरन्यायाधीश भुषण गवई ह्यांच्यावर झालेल्या ब्राह्मण्य बुट फेक प्रकरणाचा"* केवळ जाहिर निषेध झालेला नसुन बुध्द आंबेडकरी तमाम संघटना / विभिन्न ठिकाणातील वकिलांच्या संघटना / *"सर्व जाती धर्म वर्गांच्या संघटना आणि मान्यवर / इतकेचं काय तर बुट फेकणा-या एड. राकेश किशोर तिवारी ह्यांच्या घरावर मोर्चा काढला गेला."* सोबत एड राकेश किशोर तिवारी ह्या नालायक वकिलांच्या *"क्षेत्र फ्लॅट धारकांनी तिवारींच्या नालायकगिरीची लेखी तक्रार"* व्हायरल केली. भारतात जिकडे तिकडे घटनेचा जाहीर निषेध केला जात आहे. *"ब-याच राज्यात पोलिस तक्रारी रजीस्टर"* झालेल्या आहेत. मागिल *"चार दिवसांपासून मी व्हायरल तापाने"* पिडित होतो. बेडवरुन उठणे ही मला जड होते. *"लिखाण करणे ही मला जड होते‌"* आज हलके वाटले म्हणुन वाचन केले तर आपले पत्र दिसले. तेव्हा आपल्या जाहीर *"व्यंगात्मक पत्रामध्ये"* सुधार होणे गरजेचे आहे. सदर दुषित मानसिकता वकिलाचे *"सर्वोच्च न्यायालयातील वकिल पंजिकरण"* रद्द करण्यात आलेले आहे. केवळ एक सत्य आहे की, *"दिल्ली पोलिसांत सदर प्रकरण हे अजुनही रजीस्टर केले गेले नाही."* ह्या मागिल शुक्राचार्य कोण आहेत ??? ह्याचा शोध गरजेचा आहे.

         सुषमाताई,  *"ब्राह्मणी मानसिकता"* दृष्टीकोणातुन आपण सदर पत्रात *"पापी"* हा शब्द प्रयोगाशी मी पुर्णतः सहमत आहे. आपण सदर खुल्या पत्रामध्ये *"होणा-या ट्रोलला"* फेस करण्याची / ती सहन करण्याची मानसिकता ठेवल्याचे म्हटले आहे. ही जर स्पष्ट वैचारिकता आपल्यात असल्यास सदर *"पत्रातील आशय सुधारणा करण्याची मानसिकताही"* प्रत्येक व्यक्ती व्यक्तींमध्ये ही असायला हवी. सुषमाताई, आपण आजपावेतो *"एकाही विचारपीठावर"* एकत्र आलेलो नाही वा परस्पर *"आपली भेट"* झालेली नाही. आपण आता राजकारणात जास्त व्यस्त असता. माझा ही व्यस्तपणा हा असतोच. *"कधी तरी आपली भेट"* झाल्यास आपण ह्या विषयावर अवश्य बोलु यां ! सदर पत्राचा शेवट गवई साहेबांना आपण *"काका"* संबोधुन केला. मी सुध्दा पत्राचा शेवट आपला मोठा भाऊ म्हणून करतो आहे.

आपला मोठा भाऊ 

*डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*

नागपूर दिनांक ११ आक्टोंबर २०२५

No comments:

Post a Comment