🌾 *बुद्ध कळीला बहरतांना...!*
*डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*
मो. न. ९३७०९८४१३८
कोमल फुलाची पाकळी तोडु नको हे
बुध्द कळीला बहरतांना मला रे बघु दे...
ह्या गुलाब सुगंधी बागेत रमुन जावु हे
चांदणी मनाचे मधु सुख मला रे घेवु दे
ह्या निसर्ग प्रवासात खुप असे फिरु हे
हे किरणा़ंचे शीतल बोल मनात रूजु दे...
हे सुगंधाच्या प्रेमाला रोम स्पर्श हळु हे
मोग-याचा सुगंध मन हवेत रे दरवळु दे
पाखरांच्या किलबिलाचे गीत ते गावु हे
करुणेचा सागर जगी असाचं ओथंबु दे...
वाटा पळवाटा रस्त्याने असेच रे जावु हे
मनाच्या आडोश्याची सावली ही येवु दे
हे प्रात: सुर्याचा ना अस्त कधी मावळु हे
अंधा-या काळोख्याची भीती दुर होवु दे...
---------------------------------------
नागपूर दिनांक २० ऑक्टोबर २०२५
No comments:
Post a Comment