Wednesday, 22 October 2025

 👌 *प्राचीन बौध्द इतिहास नाकारणा-या खुटी महान (?) आधुनिक विद्वानाकरीता !*

         *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'* नागपूर 

         मो. न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२


      माझ्या *"पुष्यमित्त हा शुंग वंशी नव्हता तर मौर्य बौध्द वंशी होता"* ह्या लेखावर विवाद सुरु झाला. *"ब्राह्मण"* अस्तित्व हा विषय वादाचा झालेला आहे. तरी पुन्हा माझा लेख तो दोन तिनदा वाचावा. समजुन घ्यावा. उमगुन घ्यावा. त्यानी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर मी देत आहे.

1. सिंधु घाटी सभ्यता हे प्रमाण विश्व वैज्ञानिक - संशोधक मानतात. सदर सभ्यता ही *"नगरीय सभ्यता"* होती. *"वैदिक धर्म / ब्राम्हण धर्म"* अस्तित्व / *"स्टेफी चरवाह"* हा ब्राह्मण DNA आढळला नाही. आणि सदर काळात विदेशातुन ब्राह्मण सिंधु घाटीत आले‌ ह्या थेअरीला ब्रेक आला. सिंधु घाटी *"लिपी ही वाचली / समजली / उमगली"* गेली नाही. अर्थात सिंधु काळात लिपी अस्तित्वात होती. सदर अस्तित्व *"कार्बन डेटिंग संशोधनामुळे"* पुढे आले आहे. ह्या संशोधन पुराव्याला विश्व मान्यता आहे. आपण मान्य करा वा मान्य ना करा ह्याला काही अर्थ नाही.

2. तथागत बुध्द ह्यांचा जन्म *"कार्बन डेटिंग संशोधनामुळे इ‌ पु‌ ६२३"* (आता इ. पु. ५६३) अर्थात पुन्हा ७० वर्ष आधी बुध्दाचा जन्म  *"लुंबिनी"* येथिल उत्खनन / कार्बन डेटिंग संशोधनामुळे पुढे आले आहे. बुध्द काळात *"ब्राह्मण वर्ग"* असल्याचे कोणतेही वैज्ञानिक प्रमाण उपलब्ध नाही. *"सम्राट अशोक शिलालेखात"* सुध्दा ब्राह्मण अस्तित्व दिसुन येत नाही. अगदी *"चाणक्य - कौटिल्य ब्राह्मण"* सुध्दा असल्याचे प्रमाण नाही. बुध्द काळात *"वंश व्यवस्था"* अस्तित्वात होती. जसे - शाक्य वंश / कोलिय वंश / हरयक वंश / मौर्य वंश / कुषाण वंश इत्यादी. *"ब्राम्ही लिपी - धम्म लिपी "* ही बुध्द काळाची देणं आहे. ती वाचली / समजली / उमगली गेली आहे. *"पाली प्राकृत भाषा"* सुध्दा बुध्द काळात प्रचलित होती. *"ब्राम्ही लिपी - पाली भाषा"* ह्या भारतातील सर्व भाषा - लिपी ह्यांची जननी आहे, ह्याला संशोधनतुन मान्यता मिळाली आहे. तुमच्या मानल्या न मानल्याने काही फरक पडत नाही.

3. बुध्द काळात *"बम्हण"* हा शब्द प्रचलीत होता. *"ब्राह्मण"* हा शब्द अर्थ अलग आहे. बम्हण शब्दाचा अर्थ *"विद्वान वर्ग"* आहे. दुसरा अर्थ *"समन / ऐकणे"* असाही आहे. पाली भाषेत *"(र) / ऋ / श / क्ष / त्र / ज्ञ"* हे शब्द नाहीत. मौर्य काळात युनानी राजदुत *"मेगास्थनीज"* हा सात वर्ष मौर्य दरबारात होता‌. त्याने *"इंडिका"* हा ग्रंथ लिहिला. त्यामध्ये सात वर्ग असल्याचा संदर्भ आहे. *"विद्वान वर्ग / खेतीहार वर्ग / पशुपालक वर्ग / कारागीर वर्ग / सैनिक वर्ग / दुकानदार वर्ग / गरिब वर्ग."* ह्यानंतर पहिल्या शतीत आलेल्या *एरियन* ह्या इराणी वैज्ञानिकाने ही त्यांच्या *"इंडिका"* ग्रंथात उपरोक्त विचारांचीच री ओढलेली आहे. इसवी ९ - १० शतकातील वैज्ञानिक *"अलब्रुनी"* सुध्दा सदर मतांची पुष्टी करतो. आपल्या मानल्या वा न मानल्याने त्या संशोधनावर काही फरक पडत नाही.

4. The legend of king Ashoka : A study and Translation of a Ashokavadana ( By John S Strong) ह्यांच्या पुस्तकात केवळ *"पुष्यमित्त"* असा संदर्भ आहे. *"शुंग वंश"* नाही. *पी लक्ष्मी नरसु* ह्यांचे *"जाती एक अध्ययन / The Essence of Buddhism"* हा संदर्भ बुध्द इतिहासाचा बोध करतो. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी पी लक्ष्मी नरसु ह्यांच्या पुस्तकांचा संदर्भ घेतल्याचा आंबेडकर लिखाणातुन दिसुन येईल. ह्याशिवाय *"भर्तृहरी एक दार्शनिक / इत्सिंग की यात्रा / लंकावतार सुत्र"* ही पुस्तके संदर्भ आपणास घेता येतील. सदर विवाद हा *राहुल सांस्कृत्यायन* / केदारनाथ पांडे लिखित *"व्होल्गा टु गंगा"* ह्या पुस्तकापासुन झालेला आहे. कदाचीत पाली भाषेच्या ज्ञानाचा त्यांच्यात अभाव असावा. *"दिपवंश / महावंश / मुद्राराक्षस"* ह्या प्राचीन काळातील बौद्ध ग्रंथाचाही संदर्भ घेता येईल. आपण सदर संदर्भ मानावे वा ना मानावे काही फरक पडत नाही.

5. *"त्रिपिटक"* हे पहिल्यांदा सिंहली भाषेत (श्रीलंका) लिहिल्या गेले. श्रीलंकेत *"ब्राम्हण समुदाय"* आहे / होता काय ? हा संशोधनाचा विषय आहे. भारतातील काही विद्वानांनी श्रीलंकेत जावुन *"त्रिपिटकाचे"* अध्ययन करुन अलग अलग भाषेत त्यांचे भाषांतरण केले आहे. सदर भाषांतरकारावर काही आरोप असल्यास हा विषय वेगळा आहे.

6. पहिल्या शतकात बौध्द धर्म हा *"महायान - हिनयान"* ह्या दोन संप्रदायात विभागला गेला. हिनयान संप्रदायाने *"पाली भाषेचाच"* पुरस्कार केला. तर महायान संप्रदायाने पाली भाषेवर संस्कार करुन *"हिब्रू संस्कृत भाषा"* हिचा अविष्कार केला. परंतु दोन्ही भाषेची लिपी मात्र *"ब्राम्ही लिपी - धम्म लिपी"* हिच होती. त्यानंतर आलेली / आताची संस्कृत ही *"क्लासिकल संस्कृत "* असुन लिपी ही *"देवनागरी"* आहे. देवनागरी लिपी ही इसवी ११०० मध्ये प्राथमिक स्वरुपात आली असली तरी ती व्यवहारात *"इसवी १७९६"* ला आली. ह्याशिवाय इसवी १ - ५ शतकात *"अपभ्रंश भाषा"* / १२ व्या शतकात *"आदि हिंदी भाषा"* ही अस्तित्वात आली. *"सामान्यत: पाली प्राकृत भाषेची अंतिम अपभ्रंश अवस्था म्हणजे आदि हिंदी होय."* ह्याला मान्यता दिली गेली आहे. पुढे १८ व्या शतकात *"आधुनिक हिंदी भाषा"* हिचा उगम झाला.

7. पहिल्या शतकात बौध्द धर्म हा दोन भागात *"महायान - हिनयान"* विभागल्यावर / पाचव्या शतकात महायान ने *"वज्रयान संप्रदायाला"* जन्म दिला. आणि आठव्या शतकात वज्रयान ने *"तंत्रयान संप्रदायाला"* जन्म दिला. इसवी ८५० ला *शंकर* नामक व्यक्तीचा जन्म होतो. तो *"प्रछन्न बौध्द"* म्हणुन परिचीत होतो. इसवी दहाव्या शतकात वज्रयान / तंत्रयान संप्रदायाने *"शैव पंथ / वैष्णव पंथ / शाक्त पंथ"* ह्याला जन्म दिला. *"वैदिक धर्म / ब्राह्मण धर्म"* उगम हा *"इसवी ११ - १४"* ह्या कालावधीतील असावा. शंकर नामक व्यक्तीने स्वतःला *"आदि शंकराचार्य"* म्हणुन घोषित करुन / *"महायान बौध्द विहारा वर आपले अधिपत्य"* तयार करुन *"चार पीठाची"* स्थापना केली. पुढे इसवी ११ - १४ कालखंडात सदर चार पीठात *"चार वेदाचे"* निर्माण केले गेले. *"ऋग्वेद"* ह्या ग्रंथाची प्रमाणित प्रत ही *"युनोस्को ला इसवी १४७०"* सादर केली गेली. *"मनुस्मृती / वेद / उपनिषदे / रामायण / महाभारत "* ही सर्व ग्रंथ *"कागदावर"* अंकित आहेत. *"शिलालेख / ताम्रपट / ताडपत्र"* ह्यावर अंकित नाही. कागदाचा शोध हा *"इसवी १० व्या शतकात चीन"*  देशात लागला. सदर प्रमाण असतांना कुणी हे प्रमाण मानत नसल्यास अश्या *"बुध्दीवाद्यांच्या बुध्दीला"* आपण काय म्हणावे ?

8. सदर तथाकथित बुद्धिवादी मंडळी ही *"डॉ बाबासाहेब आंबेडकर"* संदर्भ ग्रंथ म्हणून प्रमाण देत आहेत. मी सुध्दा *बाबासाहेब आंबेडकर* ह्यांना माझा आदर्श मानतो. महान अर्थशास्त्री *अमर्त्य सेन* हे सुध्दा डॉ बाबासाहेबांना आपला *"आर्थिक विचार गुरु"* मानतात. बाबासाहेबांनी *"हिंदु"* शब्दाचा अर्थ शोधतांना अन्य विद्वानांसोबत चर्चा केलेले संभाषण वर्णन *सोहनलाल शास्त्री* लिखित *"डॉ बाबासाहेब आंबेडकर के संपर्क में २५ वर्षं"* ही पुस्तक आहे. अर्थात बाबासाहेब आज आपल्यात असते तर, *"कार्बन डेटिंग संशोधन / नविन नविन संदर्भ"* आधारे आम्हाला *"नवं - नविन शोध लिखाण"* दिले असते. बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे *"लिखाण हे तत्कालीन कालानुसंगत अगदी बरोबर"* आहे. त्यावर शंका घेण्याचे काही कारण नाही. आज संशोधन युगात आपण नवं - नविन संशोधन लिखाण करु नये काय ? हा प्रश्न आजच्या *"खुटी महान बुद्धीवादीमूळे (?)"* निर्माण होत आहे. त्यांच्या मते त्यांचा *"खुटीवादी बुध्दीवादी"* (?) ग्रुपच खरा आंबेडकरी आहे. अन्य मंडळी ही *"गैर आंबेडकरी"* आहे. ती खुटीवादी विद्वान  (?) *"त्रिपिटक"* सुध्दा नाकारतात. सोबत *"विपश्यना"* ही नाकारतात. त्यांच्या मते *"बाबासाहेब ह्यांनी हे सर्व नाकारलेले आहे."* सदर तथाकथित बुद्धिवाद्यांनी (?) *"आंबेडकर किती समजला ?"* हा संशोधनाचा विषय आहे. बाबासाहेब डॉ आंबेडकर ह्यांनी म्यानमार बौध्द परिषदेत सदर संदर्भासाठी *"Fatal"* (घातक) हा शब्द प्रयोग केलेला आहे. कोणताही गोष्टींचे *"अतिकरण / गैरवापर"* होणे म्हणजे ती गोष्ट *"घातक"* होय. सदर *"घातक"* ह्या शब्दाचा अर्थ  *"नाकारणे"*  म्हणता येणार नाही. परंतु आपण सदर तथाकथित बुद्धिवाद्याना काय म्हणणार ? आपण *"आंबेडकरी"* आहोत किंवा नाही, ह्याकरीता त्या खुटीवाद्यांच्या *"कुटी शाळेतील प्रमाणपत्राची"* आम्हाला काही गरज नाही.

                जय भीम ! नमो बुध्दाय !!!

▪️ *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*

       नागपूर, दिनांक २२ ऑक्टोबर २०२५

No comments:

Post a Comment