Saturday, 25 October 2025

 👌 *ह्या बुद्ध तरंगाला !*

       *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'* नागपूर 

       मो. न. ९३७०९८४१३८


छेडली ती तार ही विश्वास मनाची

ह्या बुध्द तरंगाला दुर नको करु हे...


प्रेम मैत्री धाग्याला गाठ ती शक्तीची

ही प्रज्ञा शील करुणा मनात वसु दे

हे शांती अहिंसा सुत्रता ही जीवनाची

कार्य कारण भावाचे चक्र ते फिरे हे...


शोध हा शुण्याचा क्रांती ती रे विश्वाची

तुझ्याचं प्रकाशातुन झाले सारे असे हे

हे जन कल्याणा पथ अष्टांग मार्गाची

चार आर्य सत्याने दु:ख निदान केले हे...


क्षमा याचना ही रे मानव स्वीकृतीची

तु आम्हा त्रि शरण पंचशील दिले हे

भीम बाबांचे ही शरण तुझ्याच चरणी

ह्या बुध्दमय विश्वाचा ना पर्याय नसे हे...


------------------------------------------

नागपूर दिनांक २५ ऑक्टोबर २०२५

No comments:

Post a Comment