Sunday, 29 June 2025

 👌 *बुद्ध वचनाने ...!*

       *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*

        मो. न. ९३७०९८४१३८ 


बुध्द वचनाने आली शांती जगा हे

सुवर्ण मध्य काळ हा दिसे जगा रे...


नको तार छेडु तु प्रिय वीणेची हे

मधुर संगितांची लय भरली मना रे

शब्दांच्या मशाली पेटतील जगा हे

माणसांची मने ही दुभंगली कां रे...


त्या मधुर आठवणी होत्या मना हे

त्या विसरणे ही ग्रस्त व्याधी कां रे

एकमेकांना जोडण्या बांध असा हे

अशांत जगी ह्या आता शोधु कुठे रे...


ह्या जगात पेटतील ती महायुध्दे हे

साम्राज्याचा विस्तार अजुन किती रे

पंचशील नाद गुंजला ह्या जगात हे

सत्याचा मार्ग हाचं झाला सम्यक रे...


प्रेमाचा बंध हाच जगात सच्चा हे

आज तो सापडुन ना दिसे कुठे रे

देशभक्ती ज्वाला आता पेटवु या हे

विश्वाची शक्ती ही निर्माण करु या रे...


---------------------------------------

नागपूर दिनांक २८ जुन २०२५

No comments:

Post a Comment