Sunday, 15 June 2025

 👺 *मृत्युच्या क्षणाचा (?) माझ्या जीवनातील जीवघेणा अनुभव ....!* (डॉ‌ बी आर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु म प्र आणि मुंबई प्रवास कार अनुभव)

       *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य',* नागपूर १७

राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल 

एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु म. प्र.

बुध्द आंबेडकरी लेखक, कवि, समिक्षक, चिंतक 

मो. न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२


        *"एयर इंडिया फ्लाईट AI171 बोईंग ड्रीमलाइनर अहमदाबाद लंडन"* ह्या विमानाने टेक ऑफ केल्यानंतर काही मिनिटांत ते विमान कोसळुन आगीच्या ज्वालात २४१ प्रवासींचा मृत्यु झाला. अशीच *"माझ्या बालपणी"* ५० - ६० वर्षांपूर्वी नागपुरात झालेली *"नागपुर फ्लाईंग क्लबचे शिकावु विमान दुर्घटना"* मला आठवली. आम्ही लहान मुले ही गच्चीवर खेळत असतांना झालेली *"शिकावु विमान दुर्घटना"* आम्ही प्रत्यक्ष बघितली आहे. पुढे *"नागपूर फ्लाईंग क्लब"* ह्या ठिकाणी माझ्या कंपनीला काही काळाकरीता *"एम्प्लॉइज सर्व्हिस प्रोवायडर"* म्हणुन काम मिळाले होते. अश्या विमान दुर्घटना ह्या आधी ही ब-याच झालेल्या आहेत. *"परंतु त्यापासुन आपण काही शिकावे ?"* चुक सुधारावी ही मानसिकता माणुस प्रवृत्तीची दिसुन येत नाही. पुनश्च असे दु:खद अपघात होणार आहेत. *"काही मानवी चुकांमुळे तर काही तांत्रिक चुकांमुळे !!!"* ही अपघात परंपरा / मृत्यु तांडव परंपरा पुढे ही सुरुच राहाणार आहे. ह्या घटनेने मला माझ्या जीवनातील काही जीवघेण्या घटनांची आठवण झाली. *"डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु (म. प्र.)"* येथे दरवर्षी *"राष्ट्रिय सेमिनार"* त्याकरीता मला बोलावणे येत असे. सदर सेमिनारला माझा कधी *"इंदुर येथे विमान प्रवास"* असे. तर कधी ट्रेनचा प्रवास असे. इंदुर येथुन महु येथे जाण्याकरीता आमच्या करीता डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ ह्यांची कार ही उभी असायची. मग *"विद्यापीठ गेस्ट हाऊस"* येथे आमचा हा मुक्काम असायचा. बरेचदा मी माझ्या *"कारने"* ही माझ्या परिवारा समवेत महु येथे गेलेलो होतो. कार हा माझा ड्रायव्हर चालवीत असे.

           डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु ह्याचा सन २०१४ ह्या साली *"सुवर्ण महोत्सव"* असल्याने विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरु *डॉ आर. एस. कुरील* साहेब आणि विभागाध्यक्ष *प्रा. डॉ ‌ सी. डी. नायक* ही माझ्याकडे आलीत. त्या मान्यवरांना महु विद्यापीठात *"तथागत गौतम बुद्ध / बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर"* ह्यांची मोठी मुर्ती ही बसवायची असल्यामुळे आम्ही मुर्ती विकत घेण्यासाठी दीक्षाभुमी येथील बौध्द मेळाव्याला गेलो‌. *"बुध्द / बाबासाहेब"* ह्यांची मुर्ती विकत घेतल्यानंतर सदर मुर्ती ही *माझ्या घरी"* ठेवण्यात आली. आणि मला त्या दोन्ही मुर्तींना महु येथे पोहचविण्याची जबाबदारी ही देण्यात आली. डॉ कुरील साहेब मला म्हणाले की, *"तुम्ही उद्या एखादे वाहन करुन महु येथे यावे."* मला कारचा प्रवास हा अनुभव होता. मी डॉ कुरील साहेबांना म्हणालो की, चार चाकी वाहनाने मी सकाळी १० वाजेपर्यंत महु येथे पोहचणारचं, ह्यांची शास्वती नाही. आणि मुर्तींचे अनावरण होणे मग फार कठिण आहे. मी ट्रेन मार्गे महु येथे येणे उचित होईल. आमचे हे बोलणे झाल्यावर *डॉ कुरील साहेब / डॉ नाईक साहेब* ह्यांना माझ्या कारने नागपूर एयर पोर्ट वर सोडुन मी माझ्या कामाला लागलो. रेलची चार तिकिटे काढली. तिकिट वेटींग होते. माझ्या सोबतीला होते *सुर्यभान शेंडे / शंकरराव ढेंगरे / अधिर बागडे.* परंतु इंदुर ह्या ट्रेन मध्ये नागपूर करीता *"व्ही.आय.पी."* सीट ही राखिव नव्हती. मध्य रेल्वे प्रबंधक (DRM) ह्यांचे खाजगी सचिव (PS) *पृथ्वीराज डोंगरे / हरीश पाटील"* हे माझे मित्र आहेत. सदर दोघांनी मुंबई ला मेसेज करुन आमची तिकिटे ही कंफर्न केली. आणि आम्हाला निरोप देण्याकरीता मध्य रेल्वेचा ५ - ६ स्टाफ हा उपस्थित होता. प्रवास सुखकर झाला. सकाळी ६ वाजता आम्ही इंदुरला पोहचलो. इंदुर रेल्वे स्थानकावर आमच्या स्वागताला महु विद्यापीठातील काही स्टाफ आणि बस ही उभी होती. सदर बुद्ध / बाबासाहेब मुर्ती अनावरणाला मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री *शिवराज सिंग चव्हाण* / भारत सरकार योजना आयोगाचे सदस्य *डॉ नरेंद्र जाधव* आदी मान्यवर आम्ही उपस्थित होतो. अर्थात डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु येथे बसविण्यात आलेल्या बुद्ध / डॉ बाबासाहेब आंबेडकर मुर्तीचा हा इतिहास आहे.

            सदर *"महु सुवर्ण महोत्सव"* कार्यक्रम होण्याच्या एक वर्षापूर्वी महु (मप्र) येथे *"राष्ट्रिय सेमीनार"* चे मला निमंत्रण होते. माझ्या कारने जाण्याचे आम्ही मित्रमंडळीनी ठरविले. परंतु माझा ड्रायव्हर हा *"सुट्टीवर"* होता. आणि मी नुकतेच ड्रायव्हिंग शिकलेलो होतो. ड्रायव्हर नसल्याने मी कारने महु येथे जावु नये, असा घरचा निरोप होता. मित्र ही ड्रायव्हिंग करतील असे घरच्यांना सांगुन आम्ही महुकडे निघालो. परंतु मित्रांना ड्रायव्हिंगचा अनुभव नसल्याने *"मलाच ड्रायव्हिंग जबाबदारी"* ही पार पाडावी लागली. आम्ही महु (मप्र) येथे सकाळी सुखरुप पोहचलो. सेमिनार छान झाले. परतीच्या वेळी *"चिखलदरा"* जाण्याचा आमचा प्लॉन बनला. मी नवशिक्या ड्रायव्हर होतो. चिखलदरा - इंदुर मार्ग हा सिंगल रोड होता. आणि *"चिखलदरा पर्वतावर"* माझी कार ही बंद पडली. खाली तर मृत्यू खाई होती. *"कार चालु केल्यावर ती चढावावरुन रिव्हर्स जायला लागली."* काही क्षण शिल्लक होते. *"आम्हाला खोल दरीमध्ये मृत्युला आहुती देण्याचे !"* परंतु कार कशीबशी ही पुढे सरकली. आम्ही मृत्युच्या उंबरठ्यामधुन बाहेर निघालो. चिखलदरा पोहचलो. एक दिवस मुक्काम केल्यावर आम्ही परतवाडा दोन पदरी मार्गे नागपुरला पोहचलो. सदर घटना आज ही विसरलेलो नाही. माझ्या जीवनात असा घटना अनुभव बराच आहे. असाच एक अन्य अनुभव *"बाळासाहेब ठाकरे समृध्दी मार्ग प्रवासाचा"* आहे.*" मुंबई - पुणे - नासिक"* रात्रीचा प्रवास समृध्दी मार्गाने *"मी / इंजी. विजय बागडे / डॉ. उमाजी बिसेन"* करीत होतो. तसे बघितले तर *"समृध्दी मार्गे आमचा हा रात्रीचा प्रवास"* बराच वेळा झालेला आहे. परंतु एकदा समुध्दी मार्गावरून *"कारनी रात्रीचा प्रवास"* करतांना कारमध्ये काही खडखड आवाज यायला लागला. म्हणुन ड्रायव्हरनी गाडी एका साइडला थांबवुन तो आवाज शोध घेण्याचा प्रयत्न केला. *रात्रीच्या सुनसान क्षणी* दोन अनोळखी व्यक्ती आमच्या कारजवळ आले. काही विचारपुस ती करायला ही लागले. अर्थात ती गुंडांची *"लुटपाट टोळी"* असण्याचा बोध होत होता. ड्रायव्हर हा धोका कळुन चुकला. कार सुरु करुन पेट्रोल पंप जवळ पोहचुन कार मध्ये येणारा तो आवाज बघितला. पेट्रोल पंपावरील रेस्टारेंटमध्ये चहा घेवुन आम्ही मुंबई दिशेने निघालो होतो. एकंदरीत आपल्या जीवनात असे अनुभव येत असतात. अनुभव हे माणसाला नविन शिकायला सांगत असतात.


------------------------------------------

▪️ *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*

       नागपूर दिनांक १५ जुन २०२५

No comments:

Post a Comment