👌 *मनाचा शांती बोध !*
*डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*
मो. न. ९३७०९८४१३८
रात्रीचा कारचा प्रवास
ह्या रातकिड्यांचा संचार
लुकलुक प्रकाश देत होती
आणि मनाला आनंद देतांना
लुक लुक प्रकाश किड्यांनी
खरे तर प्रेमाची तार छेडली
आणि मानवी प्रेमाचा हात
त्या किड्यावर फिरविल्यावर
तो कधीच धोकादायक
माणसाला वाटला नाही
तेव्हा करुणा ही जागृत झाली...
त्या शीतल रात्री
निरव अशी शांतता होती
चंद्रं किरण साद देतांना
माझी कविता रचता झाली
कधी धुके सकाळ झाली
हे मनाला कळलेलं नाही
मग त्या धुका सकाळीतुन
मार्गक्रमण करीत असतांना
चार पदरी मार्ग
समोर नजरानजर झाला
कार मार्गक्रमण करीत होती...
कार पुन्हा गतीला झाली
सोबतीचे मित्र ही
मनातील तार छेडत होती
आणि जंगल मार्गावर
हिरवीगार वृक्ष वनराई
सुखद हवा झोका देत होती
अचानक सांची स्तुप समान
बुध्द विहाराकडे लक्ष गेले
कारची चाके हळुचं थांबली
बुध्दाला शरण जातांना
मनाचा शांती बोध होत होती ...
--------------------------------
नागपूर दिनांक २५/०६/२०२५
No comments:
Post a Comment