📖 *हे भीमाच्या संविधानाने....!!!*
*डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य,* नागपूर
मो.न. ९३७०९८४१३८
'
त्या सनातनी काळात, आम्ही होतो गुलाम गं
हे भीमाच्या संविधानाने, आम्ही झालो राजा गं...
तोंडा मडके मागे झाडु, तो पेशवा काळ गं
आरसा हा बघतांना, होता गुलामी नाद गं
नाही लाज त्यांना वाटे, स्त्री अब्रु लिलावी गं
बलात्कार करतांना, ते आनंदी उन्मादी गं...
हिंदु कोड बिलातुन, देशा आली चेतना गं
भीमाचा राजीनामा, होता स्त्री मुक्ती साद गं
ह्या शिकलेल्या स्त्रीचा, मेकअप हा बघुन गं
सावित्री-ज्योतीला भुलुनी, दिसे मनु भक्ती गं...
ह्या योगी मोदी काळी, आली भांडवलशाही गं
उद्याचा भारत, गो-या शासनाच्या बदतर गं
तरी आपण जातो राणी, प्रेमाच्या ओहोटी गं
हे उठ करू क्रांती, काळ्या अंग्रेजा विरूद्ध गं...
* * * * * * * * * * * * * * * * * *.
No comments:
Post a Comment