* *भारतीय स्त्री ही पुरुषांची मानसिक गुलाम आहे कां...? मग भावाला राखी बांधुन, भावाकडून रक्षा करण्याची ती भिख कां मागते...!*
*डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*
राष्ट्रीय अध्यक्ष,
सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल
मो.न. ९३७०९८४१३८
रक्षाबंधन ही आपली संस्कृती नाही. त्याऐवजी दुसरा कार्यक्रम घेता आला असता. *"रक्षाबंधन करणे"* म्हणजे - स्त्री ही आज ही पुरुषावर आश्रित आहे. परावलंबी आहे. ती आत्मनिर्भर नाही. ती सक्षम नाही. म्हणुन ती भावाला राखी बांधुन, भावाकडुन तिच्या रक्षणाची याचना करते. भिख मांगते. अर्थात आज ही ती *"मानसिक गुलाम"* आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी *"भारतीय संविधान"* हे राष्ट्राला समर्पित करुन, प्रत्येकाला (स्त्री आणि पुरुष) व्यक्ती स्वातंत्र दिले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले. सर्वांना समान अधिकार दिला. *"एक व्यक्ती - एक मत - एक मुल्य...!"* ही संकल्पना डॉ. आंबेडकर ह्यांनी दिलेली आहे. संविधानाच्या माध्यमातुन *"शिक्षण"* घेवुन ती माणसात आली. तथागत बुध्दाने *"मार्शल आर्ट"* च्या माध्यमातुन, स्त्रीला स्वरक्षणाचा मार्ग दिला. अर्थात *"शिक्षण / मार्शल आर्ट"* ही साधणे स्त्रीकडे असतांनाच, *"राखी बंधन - रक्षाबंधन"* ह्या बुरसटलेल्या संस्कॄतीचे ओझे, भारतीय स्त्री ही कधीपर्यंत ओढणार आहे, हा प्रश्न आहे.
No comments:
Post a Comment