Tuesday, 29 September 2020

 🏭 *राजगॄह....!*

            *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*

            मो.न. ९३७०९८४१३८


राजगॄह....!

एक वास्तव अंतर्मनाचा आरसा

आणि त्यामध्ये मी शोधतो आहे

१९५६ च्या आधीचे खरे प्रतिबिंब

बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणी

रमाईने दिलेल्या बलिदानाचे रक्त

पण आजच्या वातावरणातील धुसरतेत

आमच्या राजगॄहातील आरस्यामध्ये

समाज हा केंद्रबिंदू

केव्हाचाच हद्दपार झाला आहे...!

आज माझ्या राजगॄहात

फक्त नाव ते जिवंत आहे

बाकी सर्वच ओसाड आहे

आणि त्या ओसाडात मी एकटाच असतो

माझ्या वेदनांना वाट देतांना

सखी ही आपल्याच विश्वात असते

तिच्या कुशीची उब हवीसी असतांना

फक्त एकांत वाट्याला असतो

तेव्हा वेदनांच्या अश्रुला वाट देतांना

एक निर्झर झरा धावुन येतो

आणि घेवुन जातो बुध्दाकडे

बुध्द हे सम्यक समाधीत असल्याने

मी ही आपले डोळे बंद करतो

आणि शोधित असतो

उद्याची नविन पहाट...!!!


* * * * * * * * * * * * *



No comments:

Post a Comment