🔹 *मरण चक्र...!!!*
*डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*
मो.न. ९३७०९८४१३८
हा माणुस
जगात जन्माला येत असतांना
एकटाच आला
आणि मरतांना ही एकटाचं होता
परंतु मरण संस्कारामध्ये
तेव्हा आप्त मित्र सैलाब असायचा.
आज कोरोना संक्रमणाने
सर्वचं काही बदलवुन टाकले
बायको ही मरण संस्कार असो वा
प्रियतमाची बॉडी स्विकार
ती घेण्यास पुर्णतः नाकारत आहे
आणि मरण संस्कारात
सात लोकांचा जमावळ दिसत आहे.
मी हे सर्व उघड्या डोळ्यांनी बघतांना
आपण दोष कुणा द्यावे...?
ह्या गंभिर चिंतनात असतांनाचं
पुनश्च मित्राच्या मरणाची बातमी आली
माझ्याकडे काहीचं शब्द नव्हते
ह्या मरणावर लिहिण्याचे....!!!
हे मरण चक्र निरंतर सुरू राहाणार आहे
बुध्दाचे शब्द मला आठवुन गेले
मॄत्यु हे शास्वत सत्य आहे
म्हणुन जीवनात कुशल कर्म करावे
धोका देणारे - खोटे बोलणारे
कपट नीति करणारे
ह्या सर्वांना कोरोना संक्रमण ने
एक चांगली सिख दिलेली आहे.
संकट मोचन म्हणवणारा दडुन बसला
देवाने ही कोरोनाचा धसका घेतला
आणि आपली मंदिरे बंद केलीत
मित्रांनो, आणि हे चिरकाल सत्य आहे
आता तरी सम्यक मार्गावर जावु या
उद्याचे नविन किरण शोधण्यासं...!!!
* * * * * * * * * * * * * * * *
No comments:
Post a Comment