Tuesday, 29 September 2020

 🌹 *हे सखे....!!!*

           *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*

            मो.न. ९३७०९८४१३८


हे सखे, 

आम्हाला बंदी बनवु नकोस

बळ दे आमच्या पंखाना

उंच भरारी घेण्याचे...!

नाही तरी आम्ही आमचे मरण

स्व: डोळ्यांनी कधी बघणार नाही

डोळ्यांच्या आसवांना तु थांबवं

डॉ. आंबेडकरांनी उभारलेले गती चक्र

आम्ही केव्हाचेचं थांबवले आहे

नाही, ते उलटे फिरवले आहे.

वरून तुझ्या कुशीतील आनंदात

आम्ही मदोलिप्त होवुन बसलोत

सामाजिक बांधिलकीच्या नावावर

व्यापार चालविला जात असतांना

जुन्या व्यवस्थेची पेशवी गुलामी

पुनश्च लादली जात आहे.

आणि अशी रणनीती चालु असतांना

तुझ्या ह्या नेहमीच्या मोहिनीत

किती काळ रममान व्हायचेयं

हे एकदाचे ठरवुन टाक

कारण उद्याची असणारी गुलामी

ही तुझी सुध्दा राहाणार आहे

हे आता तरी तु लक्षात घे....!!!


* * * * * * * * * * * * * * * * *



No comments:

Post a Comment