🌹 *मी बुध्द फुल वेचले....!!!*
*डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*
मो.न. ९३७०९८४१३८
आपलेचं म्हणतांना, म्यां मनो भाव रोकले
ह्या विषम जगात रे, मी बुद्ध फुल वेचले...
आसवांच्या सागरातील, हे रुसवे फुगले
प्रेम साद मनातील, लई वादळ उठले
आप्त मित्र म्हणतांना, जहाल विष पेरले
तरी ह्या दु:ख डोंगराचे, मी शिखर चढले....
ह्या साधनांच्या अभावात ही, हे संघ बांधले
दश दिशा जगात रे, नावाची ज्योत रोवले
उध्वस्त उगवती वना, क्रांती बीज पेरले
हक्कासाठी लढतांना, मी भीम सुत्र घेतले...
हे मिलिन्द नागसेनाचे, इतिहास घडले
वारिस आम्ही त्यांचे, नावात तुफान घेतले
भीम स्वप्नांचा बुध्द भारत, मिशन उठले
ह्या संघात मित्र जोडण्याचे, मी प्रण घेतले...
* * * * * * * * * * * * * * * * * *
(माझ्या १८ ऑगस्ट ह्या जन्म दिवसाच्या
निमित्ताने ही शब्द भावना ...!)
No comments:
Post a Comment