✍️ *प. पु. डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन - भाषणे शासन प्रकाशनात दिवंगत प्रा. हरी नरके ह्यांच्या नरकवाद : एड. (डॉ.) सिध्दार्थ कांबळे ह्यांचा माफीनामा संदर्भ पॅंथर प्रकाश बनसोड संपादीत पुस्तकाची समिक्षा !*
*डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य',* नागपूर १७
राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल
एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु मप्र
मो. न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२
रातुम नागपूर विद्यापीठ नागपूर अंतर्गत *"डॉ. आंबेडकर अध्यासन विभागातील"* (Dr. Ambedkar Chair) तत्कालीन विभागप्रमुख माझा जिवलग मित्र *प्रा. डॉ. प्रदिप आगलावे* ह्यानी केलेल्या भ्रष्टाचार संदर्भात *पॅंथर प्रकाश बनसोड* संपादीत पुस्तकावर मी माझी समिक्षा लिहिली असल्याने / मिडियामध्ये ती प्रकाशित झाल्यामुळे *प्रा. आगलावे* ह्याच्या वतीने *एड. (डॉ) सिध्दार्थ कांबळे* ह्यांनी मला *"कायदेशीर नोटीस"* दिलेली आहे. सदर दिलेल्या कायदेशीर नोटीसला योग्य वेळी उत्तर दिले जाणार आहे. परंंतु सदर नोटीस मध्ये *"प्रा. हरी नरके* संपादित महाराष्ट्र शासनाच्या *"डॉ बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन* पुस्तकातील *प्रकाश बनसोड* संपादीत (१३ ऑक्टोबर २०१० रोजी) केलेले पुस्तक *"डॉ बाबासाहेब आंबेडकर : लेखन - भाषणे - समस्या आणि उपाय"* हा संदर्भ देतांना *प्रकाश बनसोड* ह्यांच्यावर काही टिका केली गेली. मला प्रा बनसोड पासुन अलिप्त असावे, असा तो संदेश आहे. तेव्हा मी पॅंथर *प्रकाश बनसोड* ह्याला फोन करून सदर पुस्तक मागावुन घेतले. आता मी सदर दुस-या पुस्तकावर माझी समिक्षा करीत आहे. सदर पुस्तकात मला ज्या वकिलांनी कायदेशीर नोटीस दिलेली आहे, ते *डॉ. सिध्दार्थ कांबळे* - पुर्वीचे पशु डॉक्टर आणि आताचे वकिल ह्यांनी तत्कालीन शिक्षणमंत्री *दिलिप वळसे पाटील* ह्यांना चरित्र साधने प्रकाशन समितीचे "सदस्य सचिव" *प्रा. हरी नरके* (९ ऑगस्ट २०२३ ला स्मृतीप्राप्त) ह्यांच्या *"एककल्ली कारभाराची"* गंभीर तक्रार *दिनांक ६ ऑक्टोबर २००५* रोजी केलेली दिसुन आली. आणि तब्बल १७ वर्षांनंतर २४ जानेवारी २०२२ ला *डॉ सिध्दार्थ कांबळे* ह्यांनी *प्रा. हरी नरके* ह्यांना सदर तक्रारींचा *"माफीनामा"* दिल्याची चर्चा आहे. *डॉ सिध्दार्थ कांबळे* ह्यांनी सदर माफीनामा मागण्यात काय *"गौडबंगाल"* आहे ? हे डॉ. सिध्दार्थ कांबळे ह्यांनाच माहित !!! डॉ सिध्दार्थ कांबळे हे सदर तक्रारीत चरित्र साधने प्रकाशन समितीचे ओएसडी *वसंत मुन* हे त्यांचे *"अंकल"* असल्याचे लिहिलेले आहे. *वसंत मुन ह्यांचे निधन १ एप्रिल २००२* रोजी झाल्यानंतर *दिनांक २३ ऑगष्ट २००२* ह्या रोजी महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार *प्रा. हरी नरके* ह्यांची *"ओएसडी"* (Officer on Special Duty) ह्या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. परंतु *प्रा. हरी नरके* ह्यांनी *"ओएसडी"* पदामध्ये बदलाव *"सदस्य सचिव"* म्हणुन करुन घेतले. हा सुध्दा अलग इतिहास आहे. मग चरित्र साधने प्रकाशन समितीला कशी घरघर लागली आणि *"खंडांचे प्रकाशन"* होण्यास कसा विलंब झाला, हा संदर्भ इतिहास म्हणजे *प्रकाश बनसोड* संपादीत ती पुस्तक होय.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्रे - साधने प्रकाशन समितीची *"स्थापना दिनांक १५ मार्च १९७६"* ला तत्कालिन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ह्यांच्या *"अध्यक्षतेखाली"* करण्यात आली होती. डॉ. आंबेडकर ह्यांचे उद्दीष्टे पुर्ण करण्यासाठी *"ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी"* (OSD) हे पद निर्माण करुन सन १९७८ मध्ये *वसंत मुन* ह्यांची सदर *"पदावर नियुक्ती"* करण्यात आली होती. डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांची चळवळ - भाषणे - लिखाण साहित्य हे विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. परंतु सदर साहित्य प्रकाशन करण्यास *वसंत मुन* ह्यांनी संपूर्ण हयात पणास लावली. त्यांनी बाबासाहेब ह्यांचे *"विखुरलेले साहित्य जमा"* करण्यास प्राणाची बाजी लावली. त्यांना बाबासाहेब ह्यांच्या तत्वज्ञान - चळवळीची खुप जाण होती. सदर विषयावर वसंत मुन ह्यांनी लिखाण सुध्दा केले आहे. *"डॉ बाबासाहेबांचे बरेच लिखाण साहित्य ट्रंकमध्ये बंद होते."* काही साहित्य लिखाणाला *"किड"* लागलेली होती. पेटी मध्ये सदर साहित्य खुप वर्षे बंदिस्त असल्याने *"कुबट वास"* सुटलेला होता. सदर सर्व लिखाण साहित्य *वसंत मुन* ह्यांनी *"छान स्वच्छ"* करुन खंड रुपात *"दोषरहीत"* प्रकाशित केलेले होते. पेटीतील *"साहित्याच्या दुर्गंधीने"* वसंत मुन हे *"आजारी"* ही पडलेत. वसंत मुन ह्यांनी केलेला हा *"प्रयास मी व्यक्तीश:"* वसंत मुन ह्यांच्याकडुन ऐकलेला आहे. *वसंत मुन* ह्यांना मी आयोजित केलेल्या एका *"कार्यक्रमात निमंत्रित"* केले होते. वसंत मुन ह्यांच्या *हनुमान नगर नागपुर येथील घरी* आणि वर असलेल्या *लायब्ररीत* ही माझे कधी कधीचं जाणे असे. *मुंबई* येथिल घरी सुध्दा *वसंत मुन सोबत माझी भेट* झालेली आहे. वसंत मुन सोबतच्या *"माझ्या अल्प सानिध्याने"* मला वसंत मुन ह्यांच्या मेहनतीची जाण आहे. *वसंत मुन* जेव्हा संपादन कार्यात रममान होते तेव्हा *प्रा प्रदिप आगलावे आणि मी स्वतः* विद्यार्थी दशेत होतो. सध्या वकिली करीत असलेला पशुचा डॉक्टर *सिध्दार्थ कांबळे* हा आमचा मित्र *वसंत मुन हे अंकल* सांगत असतांना वसंत मुन ह्यांच्या सोबत *"१६ वर्षांचा"* संदर्भ देत आहे. मग डॉ सिध्दार्थ कांबळे हे प्रकाशन समितीचे सदस्य सचिव *प्रा. हरी नरके* ह्यांच्या *"नरकवाद कार्याची कां बरे वाहवा"* करीत आहे ? कां बरे हरी नरके ह्यांना *"माफीनामा"* सादर केला आहे ? सदर संदर्भ खरे तर संशोधनाचा विषय आहे असे म्हटलेले बरे !!! *वसंत मुन* ह्यांनी घेतलेले परिश्रम त्यानंतर आलेल्या एकाही *"ओएसडी / सदस्य सचिव"* ह्यांनी घेतलेले नाहीत, हे खेदाने म्हणावे लागते. फक्त *"तोरा दाखविण्याचे / मानधन - शासन लाभ घेण्याचे काम"* नंतर नियुक्ती झालेल्या तमाम *"ओएसडी वा सदस्य सचिव "* पदस्थ लोकांनी केलेले आहे. नंतर काही खंड प्रकाशित झालेत ही ! परंतु सदर *"प्रकाशीत खंडाच्यावर दोषपूर्ण"* (?) असल्याचा *"काळा शिक्का"* हा लागलेला आहे. ह्याला आपण काय म्हणावे ? सदर काळ्या शिक्क्यात सध्या कार्यरत *"सदस्य सचिव"* माझा जिवलग मित्र *प्रा. प्रदिप आगलावे* हा सुध्दा सुटलेला नाही. प्रदिप आगलावे ह्याच्यावर *"शासन प्रकाशन समितीच्या सदस्यांनीचं"* गंभिर आरोप केलेले आहेत. अगदी तत्कालीन सदस्य सचिव *"प्रा. हरी नरके* ह्यांनी केलेला *"एककल्ली कारभार"* समकक्ष एककल्ली कारभार हा माझा जिवलग मित्र *प्रा. प्रदिप आगलावे* ह्यांचा राहिलेला आहे.
प्रकाशन समितीचे "सदस्य सचिव" *प्रा. हरी नरके* ह्यांनी सन २०१० मध्ये *"खंड २१, २२"* प्रकाशित करतांना कोणतेही मोठे योगदान दिलेले नाही, हा आरोप समिती सदस्यांकडुन केला गेला. औरंगाबाद येथिल *प्रा. दत्ता भगत* हे सुध्दा *"सदस्य सचिव"* झालेले होते. ह्यांचाही कार्यकाल हा विवादीत राहिलेला आहे. प्रकाशित खंडातील *"पेज नंबर सहित चुकांची फार माठी जंत्रीच"* ब-याच बाबासाहेबांच्या अभ्यासक वर्गांनी तयार करुन तश्या अनेक तक्रारी ह्या महाराष्ट्र शासनाकडे करण्यात आल्या होत्या. आणि सदर खंडाची *"विक्री थांबवुन"* ती पुन्हा *"पुनर्मुद्रण"* करण्याची मागणी झाली. कारण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या *"लिखाणाच्या संदर्भात चुकीचा संदेश"* जावु नये, हा त्यामागे समिती सदस्यांचा चांगला उद्देश होता. दिनांक १४ एप्रिल २०१० रोजी प्रकाशित *"डॉ. बाबासाहेब आंबेडकर : चित्रमय चरित्र"* ह्या ग्रंथात छायाचित्रांच्या तज्ञांनी *"४६० छायाचित्रे"* ही निवडुन दिलेली होती. परंतु *"खंड २२ मध्ये १९८ फोटोंचा"* समावेश करण्यात आला. परंतु सदर फोटोच्या खाली *"फोटोचा संदर्भ"* हा दिला गेला नाही. मग सदर फोटोला जीवंतपणा कसा येणार आहे ? उर्वरित *"२६२ फोटोंचे"* काय झाले ? सदर प्रश्न निवड समिती सदस्यांनी प्रा. हरी नरके ह्यांना केलेले होते. नामांकित चित्रकार *प्रा. प्रमोद रामटेके* हे अल्बम समितीचे सदस्य होते. त्यांना सुध्दा अंधारात ठेवले गेले. खंडाची बांधनी करण्यात *प्रा. मधुकर कासारे / एन. जी. कांबळे (Retd. IPS) / प्रा. अशोक गोडघाटे* ह्यांनी खुप मेहनत घेतलेली दिसुन येत आहे. ह्या समिती सदस्यांना विचारण्यात आलेले नाही. प्रकाशन समितीच्या नियमित सभा घेण्यास *प्रा हरी नरके* हे उदासिन असल्याची जाण ही *प्रकाश बनसोड* संंपादित पुस्तक देत आहे. बाबासाहेबांच्या ग्रंथ संपदा समितीतील *खासदार रा. सु. गवई / खासदार रामदास आठवले / आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे / डॉ. नितीन राऊत* इत्यादी राजकिय नेत्यांनीही उचित प्रकाशन होण्यास आवाज उठविल्याचे ही दिसुन येत आहे. असे जरी असले तरी *प्रा. प्रदिप आगलावे* ह्यांना "सदस्य सचिव" होण्याकरीता *डॉ. नितीन राऊत* ह्यांनी केलेली शिफारस खुप वेदना लावुन जाते. कारण *प्रा. हरी नरके आणि प्रा. आगलावे* ह्यांची काम करण्याची पध्दती एकसमान दिसुन येत आहे. *"प्रकाशन खंडातील चुका ही !!!"* खरे तर ह्या प्रकाशन समितीतील काम हे *"सामुहिक असे काम"* आहे. व्यक्तिगत काम नाही. परंतु हा अभाव समितीतील कार्यात दिसुन येत आहे. *प्रकाश बनसोड* ह्यांनी पुस्तक संपादन करतांना नामांकित चित्रकार *प्रा. प्रमोद रामटेके / रमेश शिंदे / प्रा. भगवान धांडे / उध्दव नारनवरे / गजानन बोदडे / पॅंथर प्रकाश बनसोड / डॉ. सिध्दार्थ कांबळे / प्रा. डॉ. एस. एन. बुसी (Retd. IRS) / आलोक देशपांडे* ह्यांच्या लिखाणाचा समावेश केला आहे. ह्याशिवाय सदर पुस्तकात अजुन काही मान्यवरांचा संदर्भ दिला आहे. सदर पुस्तक हे *"विनामूल्य वितरण"* (?) अन्वये लिहिण्यापेक्षा *"देणगी मुल्य ५० - १००/-"* असे ठेवायला हवे होते. असो. ही पुस्तक आंबेडकरी प्रेमींनी एकदा वाचायलाचं हवे. पुस्तकाचे मुखपृष्ठ नामांकित चित्रकार *प्रा प्रमोद रामटेके* ह्यांनी सुबक तयार केलेले आहे. *पॅंथर प्रकाश बनसोड* ह्याच्या ह्या कार्याला मंगल कामना देतो.
-----------------------------------------------
▪️ *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*
नागपूर दिनांक १ सप्टेंबर २०२५
No comments:
Post a Comment