🥀 *मोगरा कळी फुलली हे...!*
*डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*
मो. न. ९३७०९८४१३८
मोगरा कळी फुलली हे फुलात रे
प्रेमाचा मधु गंध हा बुध्द जगात रे...
श्वासाची धडकन बघावी हृदयी रे
लोकांची नाती जुळती बंधनात रे
वै-याची वैरता दिसे कटु शब्दात रे
मैत्रीची भावना शोभे बुध्द मनात रे...
निसर्ग चक्रातुन फिरते हे विश्व रे
हवेच्या दावणीत आहे हे जीव रे
कटु नीतिचा घाव आहे मानवा रे
हे सत्याचा शोध तो बुद्ध युगात रे...
प्रेमाचा राजा दिसतो हा गुलाब रे
पाकळ्या गळणे स्वभाव हे तुझा रे
दोषांची मानसिकता ह्या मानवा रे
जोडणारा सच्चा दुवा बुद्ध भाव रे...
------------------------------------
नागपूर दिनांक २३ सप्टेंबर २०२५
No comments:
Post a Comment