🫀 *हे हृदयातील प्रेम भाव !*
*डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*
मो. न. ९३७०९८४१३७
हे हृदयातील प्रेम भाव ह्या ओठांवर यावे
बुध्द जगातील भीम किर्ती दिगंतात वावे...
निसर्ग शब्दांचे शांती गीत हे मनात यावे
संगिताची मधुर सुर ताल तु छेडीत जावे
ह्या सुगंध लहरी धुनीत मी रममाण व्हावे
बुध्द भीमाच्या चरणी शीर झुकता जावे...
हे दुर होता ना रे कधी तु आसपास यावे
भीमाच्या संघर्ष जीवनाची तु साक्ष व्हावे
ह्या सत्य जीवाशी ना कधी बेईमान व्हावे
बुध्द भीमाच्या विचारांचे हे पाईक व्हावे...
फुलांच्या गंधानी हा आसमंत रंगुन जावे
ह्या निसर्ग जगतात रे संपुर्ण शुध्दता यावे
कुणी कुणाचे मन ना ही द्वेष पीक व्हावे
बुध्द भीमाचा नाद हा जगी गुंजता जावे...
------------------------------------------
◼️ *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*
नागपूर दिनांक ३ सप्टेंबर २०२५
🫀 *A love by heart !*
Dr. Milind Jiwane 'Shakya'
Mob. 9370984138
https://www.facebook.com/share/p/1B6fZVuWxN/
No comments:
Post a Comment