🌞 *बुध्दाचा भीम सुर्य...!*
*डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*
मो. न. ९३७०९८४१३८
ती काळ रात्र झाली, धुर्त अशा मनाची
बुध्दाचा भीम सुर्य, हे उगवे हा उद्याला...
शीतल ही छाया, आकाशी चांदण्यांची
काजवे चमकता रे, प्रकाश हा मनाला
जुळता मनाची तारे, वैभव ह्या सुखाची
द्वेषी क्रोधी तो सखा, नको माणसाला...
ती फुलपाखरे, सुंदरता अशा निसर्गाची
निष्पाप जीवाची, साथ आहे माणसाला
नको ती मैत्री, ह्या उध्वस्त रान गवतीची
प्रेमाची साद हवी, निर्दयी अशा मनाला...
बुध्दाची प्रेम गाठ, मानवी ह्या हृदयाची
हे विश्व शांंती पथ, जगी शोधता झाला
धावुनी तु येता, साथ आहे ती जगण्याची
हे करुणेचा सागर, दिसे शांती जगाला...
* * * * * * * * * * * * * * * * * *
नागपूर, दिनांक २६ जुन २०२३
https://youtu.be/1tgPDbMAnk0
No comments:
Post a Comment