Sunday, 18 June 2023

 👌 *बुध्दाचा पंचशील‌ झेंडा...!*

       *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*

       मो.न. ९३७०९८४१३८


हे सखे,

बुध्दाचा पंचशील झेंडा

हातात घेवुन चालतांना

तो खाली जमिनीवर

पडता कामा नये

ह्याची तु विशेष काळजी घे.

कारण तो पंचशील झेंडा

भविष्याचा

दीपस्तंभ असणार आहे

विश्वशांतीचे

तो प्रतिक असणार आहे. 

जात-पंथ-वर्ग-धर्मयुद्ध असो की

सत्ताप्राप्ती - सीमावृध्दीचे

अणु युध्द - परमाणु युध्द असो

वा भयाण महायुध्द असो

सर्व काही विवाद निपटल्यावर

शेवटचे सत्ताकेंद्र हे

माणुसचं आहे

आणि माणुस नसेेल तर...?

म्हणुन तथागतांनी

माणसाचे चारित्र सांगतांना

चेह-यातील सुंदरता ह्यापेक्षा

मानवी मनाच्या सुंदरतेला

खुप महत्व दिले आहे

द्वेष - स्वार्थता - धोकादारी

असत्य - खोटे बोलणे 

अश्या अवगुणांना नाकारले आहे.

सुमेध हा श्रीमंत व्यापारी

सर्व काही आपली संपत्ती

लोकांना दान करुन

हिमालय‌ भागात गेल्यावर

दीपांकर बुध्द 

सुमेधला तिथे बघुन 

शुध्दोधन‌ - महामाया ह्यांच्या पोटी

सिध्दार्थ बुध्द जन्माची

पहिली भविष्यवाणी करतात.

साकेत (अयोध्या) व्यापारी धनंजय

स्व-पुत्री बुध्द उपासिका विशाखा

हिचा विवाह

श्वावस्ती जैन व्यापारी मिगार पुत्र

पुण्यवर्धन सोबत करुन देतात.

आणि पुत्रवधु विशाखा

ही आपल्या बुध्दीच्या कसोटीवर

सासरे सेठ मिगार ह्यांना

बुध्दाचा उपासक करुन

मिगार माता म्हणुन ओळखली जाते 

आणि विशाखा ही श्वावस्तीला

दोन हजार करोड सुवर्णमुद्रा खर्च करुन

पांच मजली पुर्वाराम बुध्द विहार

दान केल्याचा इतिहास रचते.

श्वावस्ती नगरीचा व्यापारी सुदत्त

उर्फ अनाथपिण्डिक हे

राजकुमार जेत ह्यांचे जेतवन

त्यावर सुवर्णमुद्रा बिछावुन 

राजकुमार जेत कडुन‌ विकत घेतात

आणि बुध्दाला दान केल्याचा

इतिहास करुन जातात.

अहिंसक हा आज्ञाधारक विद्यार्थी

व्यवस्थेने अंगुलीमाल झालेला असतो

तेव्हा डाकु अंगुलीमालाला 

तथागतानी

भंते अहिंसक केल्याचा इतिहास आहे.

मगध नरेश - राजा बिंबिसार

कोसल नरेश‌ - राजा प्रसेनजीत

यश‌ - काश्यप बंधु

सारीपुत्त - मोग्गलान

जीवक - रठ्ठपाल - उपाली न्हावी

सुनीत भंगी - सोपाक सुप्पीय अस्पृश्य

सुमंगल - सुप्रबुध्द महारोगी

चंडालिका प्रकृती

ही बुध्दाला शरण झाल्याची

फार मोठी यादी आहे.

वैशालीची नगरवधु आम्रपाली 

बुध्दाला आम्रवन दान करते

ती आपला श्रीमंती थाट सोडुन

भिक्खुनी बनुन अर्हत अवस्थेला जाते.

सिध्दार्थ पिता - शुध्दोधन

सिध्दार्थ माता - महाप्रजापती

सिध्दार्थ पत्नी - यशोधरा

सिध्दार्थ पुत्र - राहुल

ह्यांच्या  महात्याग - सहकार्यातुन

सिध्दार्थ हे महाकारुणिक बुध्द झाले

इतिहासाचे‌ महानायक झाले.

चक्रवर्ती सम्राट अशोक 

बुध्द उपासिका‌‌ शाक्यकुमारी

महाराणी देवी हिच्या प्रभावातुन

कलिंग युध्द विंध्वस बघुन

बुध्दाला शरण गेले

आणि युध्दाचा मार्ग सोडुन दिला.

चौ-यांशी हजार स्तुप बांधले

तसेच‌ धर्मशाला - पाणवठे बांधुन

मार्गावर वृक्षारोपण करुन

अशोकाने शीलालेख लिहुन

जगाला प्राचिन‌ इतिहास सांगुन‌ गेले.

हे सखे,

आपण इतिहास पुरुष नाही

परंतु बुध्दाच्या मार्गातील वीट

आपणास बनण्यास अडचण नाही

तेव्हा बुध्दाच्या मार्गातील वीट

आपण आता होवु या 

बुध्दाचा पंचशील झेंडा

त्यामध्ये मोठ्या डौलाने फडकवु या

आपला जन्म सार्थक करु या...!!!


* * * * * * * * * * * * * *

नागपूर, दिनांक १९ जुन २०२३

No comments:

Post a Comment