Wednesday, 21 June 2023

 🌹 *मनाचे सुर जुळता...!*

       *डॉ.‌ मिलिन्द जीवने 'शाक्य'*

       मो. न. ९३७०९८४१३८


मनाचे सुर जुळता, ह्या बुध्द भीम गीतानी

ही मिशनरी बनुनी, आपण जवळी आलो...


प्राचिन त्या पीठाच्या, बड्या जाड भिंतीला

प्रिय मित्र म्हणुनी, मी गप्पा मारुनी आलो

हसत मुखी दिलेल्या, त्या प्रेम आलिंगणाला

ह्या हृदयात आठवणी, मी साठवुनी आलो...


ह्या निळ्या आकाशी, अशा पहाडी मनाला

मी घिरट्या घालुनी, कवि हृदयी तृप्त झालो

निसर्गी सौंदर्याच्या, हे जल सागरी काठाला

मैत्रीभाव जोडुनी, होडीतुन फिरुनी आलो...


ह्या रंगी बिरंगी फुलांच्या, मधुमय सौंदर्याला 

प्रेमाची हळुवार झालर, आज देवुनी आलो

हे विश्व शांतीच्या, करुणा बुध्द विरासतीला

ही कर वंदना करुनी, आज रे धन्य झालो...


* * * * * * * * * * * * * * * * * *

नागपूर, दिनांक २१ जुन २०२३


https://youtu.be/rQ8c3xdbx7c

No comments:

Post a Comment