Wednesday, 3 December 2025

 🌹 *तुझ्याचं प्रेमात रे !*

        डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य' 

        मो. न. ९३७०९८४१३८


तुझ्याचं प्रेमात रे आम्ही आंधळे झालो

बाबा केवळ तुझे गीतचं हे गाता झालो...


हे तुझे रथ चक्र आम्ही गाडुनी आलो

नेत्यांच्या फौजामागे ही फिरता झालो

ती मुखाची रे गाणी आम्ही गाता झालो

कृती आहुती आम्ही ती सोडुनी आलो...


आंम्ही शब्दांचे खुप वादे नायक झालो

इमान परीक्षा आम्ही ती नापास झालो

स्वार्थाच्या मागे रे आम्ही धावता झालो

पाय मोजे आम्ही नित्य बदलता आलो...


हे नाकाने कांदे आम्ही सोलता झालो

गद्दारी टीमचे आम्ही रे नायक झालो

गोड शब्द बोलणारे आम्ही नाग झालो

समाज एकीला बेकीत बदलुनी आलो...


ही पुस्तकी भाषा करणारे शिक्षित झालो

वितंडवाद जगाचे रे आम्ही विद्वान झालो

बुध्दीला गहाण ठेवणारे ते सज्ञान झालो

ती इज्जत बाजार मांडणारे दलाल झालो...


-------------------------------------------

नागपूर दिनांक २ डिसेंबर २०२५

No comments:

Post a Comment