Tuesday, 16 December 2025

 👌 *बुद्ध कुठे शोधू मी ?*

       *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*

       मो.न. ९३७०९८४१३८


अरे हे विशाल सागरात बुध्द कुठे शोधु मी

बरेच काही ही तप करता बुद्धवादी झालीत...


अरे तुझ्या ह्या मैत्रीचा गंध कसा शोधु मी

येथे बसलेले बरेच काही ही लांडगे झालीत

माणसांच्या निष्ठेचा शोध येथे कसा घेवु मी

स्वार्थ बाजारात बरेच काही दलाल झालीत...


अस्सल शुध्द हवेचे खरे प्रेम कुठे शोधु मी

प्रेम बाजारात बरेच काही गिराईक झालीत

सज्जनी वेदनांचा शोध असा कुठे रे घेवु मी

दुषित वातावरणा बरीच काही रोगी झालीत...


गुलाब मोगरा गंधाचे खरे मुळ कुठे शोधु मी

अहिंसा करुणा मनाला येथे रे बंधने झालीत

स्वातंत्र्य समतावादी माणुस हा कुठे शोधु मी

संविधान संस्कृती मंडीत बरीच भ्रष्ट झालीत...


-----------------------------------------

नागपूर दिनांक १६ डिसेंबर २०२५

No comments:

Post a Comment