Saturday, 1 November 2025

 👌 *हे बुद्ध सुर्याने !*

       *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*

        मो. न. ९३७०९८४१३८



ही सांज ना व्हावी रे ह्या प्रात: मनाची

हे बुध्द सुर्याने जगाला शांती दिली ही...


सृष्टी प्रेमाच्या ह्या त्या निसर्ग चक्राची

हिरवळ दाट छाया बिखरे ती जगावर

मृत्यू सत्याच्या ह्या त्या तांडव नृत्याची

भिती हर मनाला कां लागली असे ही...


शब्दांचे निखारे असो वा भाषा प्रेमाची

हे राणी वदले आणि राजा दाढी हाले

शब्दांचे वाटोळे ती ह्या माणसी जगाची

विभिन्न रुपे मनाची ती खुप बदले रे ही...


कालानु परीक्षा ही क्रांती प्रतीक्रांतीची

तो इतिहास झाला नि इतिहास संपला

हा माणुस घडला आणि माणुस संपला

ह्या इतिहासाची नोंद ना खरी दिसे ही...


---------------------------------------

नागपूर दिनांक १ नोव्हेंबर २०२५

No comments:

Post a Comment