👌 *प्राचिन बुध्द साहित्याने भारत राष्ट्रवाद देशभक्तीचा पाया रचला !* (ब्राम्हण्य धर्माद्वारे धर्म-जात्यांध शक्तीची उभारणी करुन भारतीय राष्ट्रवादाचे थडगे उभारले)
*डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'* नागपुर १७
राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल
एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु म प्र
एक्स मेडिकल ऑफिसर एवं हाऊस सर्जन
आंतरराष्ट्रीय परिषदेचे संशोधन पेपर परिक्षक
बुध्द आंबेडकरी लेखक, कवि, समिक्षक, चिंतक
मो. न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२
*"भारत राष्ट्रवाद"* म्हणजे आपल्या देशावर प्रेम करणे / देशाशी एकनिष्ठ असणे / देशाकरीता बलिदान देणे / देशाचा सर्वांगीण विकास होण्याकरीता अग्रेसर असणे / देशांमध्ये प्रेम - मैत्री - बंधुभाव - करुणा ही निर्माण करणे / देशाला आर्थिकरित्या समृद्ध करणे / देशाच्या आर्थिक विकासाकरीता योग्य अशी पायाभरणी उभी करणे / देशाला समृध्दता प्रदान करणे / देशात सामाजिक आणि सांस्कृतिक समानभाव एकसुत्रता बांधणे / देशातील बांधवाना सोयी - सुविधा उपलब्ध करुन देणे / देशाची सुरक्षा ही अ-बाधित राखणे / स्वातंत्र्य समता बंधुता न्याय या आयामांना खोलवर रूजविणे / राष्ट्र ही भावना जागविणे हा होय. दुस-या अन्य अर्थाने *"बुध्द राष्ट्रवाद शासन"* निर्माण करणे हे होय, असेही म्हणता येईल. ह्या संदर्भात *"बुध्द धर्माचे सार"* (धम्मपालन गाथा) असलेली एक पाली गाथा आहे. ती गाथा अशी - *"सब्ब पापस्य अकरणं, कुसलस्स उपसम्पदा | सचित्तपरियो दपनं, एतं बुध्दानं सासनं ||"* (अर्थात - सर्व प्रकारची अकुशल कर्म न करणे, कुशल कर्म करणे, चित्ताला परिशुध्द करणे, हिच बुध्दाची शिकवण होय. हे बुद्धाचे शासन होय.) दुसरा संदर्भ ही आहे - मगध सम्राट *अजातशत्रू* हा वैशाली राज्यावर आक्रमण करणार असल्याचे भगवान बुध्द ह्यांचेकडे बोलला असतांना / अजातशत्रू ह्यांचे बुध्दासोबत खुप चांगले संबंध असतांनाही बुध्दाने वैशाली राज्याच्या *"लिच्छवी"* गणांची प्रशंसा केली होती. मगध *सम्राट अजातशत्रू* ह्यांना उपदेश केला होता की, सम्राट तुम्ही वैशाली राज्याला जिंकु शकणार नाही. तुमची हार निश्चित आहे. आणि बुध्दांनी सम्राट अजातशत्रू ह्यांना जी सात कारणे दिली, ती *"भारतीय राजसत्ता - नीति वर्गाने"* समजुन घेणे, हे फार गरजेचे आहे.
बुध्दाने मगध सम्राट *अजातशत्रू* ह्याला वैशाली "*लिच्छवी"* गणराज्य मजबुतीची *"सात कारणे"* सांगितली होती. ती अशी - *"वैशाली लिच्छवी एकत्रीत बसुन सामुहिक निर्णय घेतात / सदर घेतलेला सामुहिक निर्णयाला ते एकजुटीने पालन करतात / व्यवस्थेच्या कायदा आणि नियमांचे पालन करतात / वृध्द गणांचा आदर सत्कार करतात / स्त्री वर्गावर लिच्छवी ही जोर जबरदस्ती करीत नाही / सामाजिक धम्माचे पालन करतात / धम्माचार्य वर्गाचा आदर सन्मान करतात."* उपरोक्त सात नियम पालना सोबतचं *"बुध्द धम्माची सारं गाथा""* मग तिचे पालन आलेचं. प्रश्न हा की, *"भारतीय राजसत्ता ही बुध्दाच्या त्या सात नियमांचे पालन करते आहे काय ?"* भारत देशातुन *"बुध्द धर्म"* हा समस्त विश्वात पसरला. जगातील ९८% अधिक लोकसंख्या ही *"आशिया पॅसिफिक"* प्रदेशात राहाते. आशिया खंडातील *"१४ पेक्षा जास्त देशात* ५०% पेक्षा अधिक लोकसंख्या ही *"बौध्द धर्म"* वर्गाची आहे. आणि त्यापैकी *"७ देशांमध्ये"* ९०% लोकसंख्या ही बौद्धांची आहे. आपल्या भारत देशातुन *"बुद्ध सुर्य उगम"* झाल्यावर ही, भारतात *"बुद्ध धर्माचे अस्तित्व"* काय आहे ? हा आहे. ज्या बुध्दगयेला बुध्दाला बोधी ज्ञान प्राप्त झाले, सदर ऐतिहासिक वारसा *"बुध्दगया बुध्द मंदिर"* ह्यावर ब्राह्मणी वर्गाचे अधिपत्य आहे, ह्याला काय म्हणावे ? मग बुध्दानी दिलेल्या *"सात नियमांचे पालन"* हे तर खुप दुरची गोटी आहे. *"भारतीयत्व भावना'"* ही तर नावालाही नाही. दिसतो तर *"हिंदु राष्ट्रवाद !"* - सशस्त्र संघर्ष / बलपूर्वक राजनीति / तिव्रता अलगाववादी विचारधारा / *"उपनिवेशवाद"* ह्या नावाने *"विष पेरले"* जात आहे. आणि ब्राह्मण्य विचारधारेचा एक बुलंद नारा आहे - *"गर्व से कहे हम हिंदु है !"* आमच्या देशात *"भारत राष्ट्रवाद"* हा शोधुनही सापडणार नाही. *"चाहें देश क्यौ न जाए भाड़ में !"* आज भारत देश *"पुंजीवादी व्यवस्थेचा गुलाम"* झालेला आहे. भारतात इंग्रज लोक *"व्यापारी"* बनुन आले आणि *"शासनकर्ते"* बनुन गेले. भारतातील *"पुंजीवादी व्यापारी वर्ग हा शासनकर्ती जमात"* झालेला आहे. ही भारतावर ओढवुन घेतलेली *"तिसरी गुलामी"* ती राहाणार आहे. एक गुलामी होती *"मुस्लिम शासनाची."* दुसरी गुलामी होती *"अंग्रेज शासनाची."* विश्व शक्ती *"अमेरिका"* हा देशही डोक्यावर बसला आहेचं. ऐतखाऊ ब्राह्मण्यवादांना *"ऐष आरामी जीवन जगण्याची"* ही जुनी सवय आहे. त्यांना *"पुंजीवादी व्यवस्था शासन पध्दतीचे"* काही देणे घेणे नाही. आधीचा *"शोषित वर्ग"* हा आता शोषणाकरीता तयार आहे नां ! असा ही प्रश्न आहे. *"चक्रवर्ती सम्राट अशोक"* ह्या बुद्ध काळातील *"अखंड विकास भारत"* (सम्राट अशोकाचे विशालकाय साम्राज्य - अफगाणिस्तान, नेपाळ, श्रीलंका, म्यानमार आदी देश) हा *"सोन्याचा धुर निघणारे दिवस"* आम्ही इतिहास जमा केलेले आह.
*"भारत राष्ट्रवादाचे"* जनक म्हणुन *राजा राममोहन रॉय* (जन्म २२ में १७७२ आणि मृत्यु २७ सप्टेंबर १८३३) ह्यांचा ब्राह्मणवाद्यांनी उदोउदो केला आहे. भारताचा *"पहिला स्वातंत्र संग्राम उठाव"* हा सन १८५७ मध्ये झाला होता, हे सुध्दा सांगतात. तेव्हा *राजा राममोहन रॉय* हे जिवित नव्हते. *"गोरे इंग्रज सत्ता कालखंड हा १८५७ ते १९४७ सालचा सांगितला जातो."* भलेही सन १६०० साली गोरे अंग्रेज हे *"ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी"* (मुळ नाव - जाईंट स्टॉक कंपनी) ह्या नावाने *"व्यापार"* करण्यास भारतात आले. भारतातील राजे - राजेशाहीतील परस्पर विरोध / वैरत्व हा त्यांनी जवळून बघितला होता. आणि हळुहळु इंग्रज व्यापारांनी सत्तेकडे कुच सुरु केली. आणि भारत देशात सत्तेवर अधिपत्य झाल्यावर, सन १८५८ ला इंग्रज व्यापा-यांनी इंग्लंडची महाराणी *"व्हिक्टोरिया"* हिच्या हातात सत्ता दिली. पुढे सन १८७६ ला इंग्लंड महाराणी *"व्हिक्टोरिया"* हिला *"भारताची महाराणी"* हे घोषित केले गेले. ह्या इतिहासावर पुन्हा कधी तरी आपण चर्चा करु या. *"सन १८५७ चा उठाव"* हा स्वांतत्र्याचा *"पहिला उठाव"* होता काय ? हा मात्र संशोधनाचा विषय आहे. कारण प्रत्येक राजसत्ता ही त्यांची *"राजसत्ता टिकविण्यासाठी इंग्रजा विरोधात लढत"* होती. ग्वालियर नरेश *शिंदिया* परिवार तर, इंग्रजांची जी हुजुरी करीत होता. इंग्रजांनी झाशीवर चढाई केली. तेव्हा झाशीची *"राणी लक्ष्मीबाई"* ही ग्वाल्हेर नरेश सिधीयांची मदत मागण्यासाठी ग्वालियर येथे गेलेली होती. झाशीचा किल्ला कमान *मागास कोरी* जातीची *झलकारी* ही सांभाळीत होती. जेव्हा शिंदीयांनी राणी लक्ष्मीबाई हिला मदत देण्यास नकार दिला / लक्ष्मीबाई येण्याची सुचना इंग्रजांना दिली, तेव्हा *झाशीची राणी लक्ष्मीबाई* हिने ग्वालियर येथे *"स्वतः जाळुन आत्महत्या"* केलेली होती. परंतु ब्राह्मणी कविंनी पोवाडा लिहिला - *"खुब लढी मर्दानी वह तो झाशीवाली राणी थी."* खरे तर इतिहासात पोवाडा हा असायला हवा - *"खुप लढी मर्दानी वह तो झाशीवा सरकारी थी |"* अर्थात मर्दानी मागासवर्गीय *झलकारी* ही मात्र वंचितचं राहीली. माझ्या *"देश - विदेशातील"* प्रवासात मला *झाशीचा किल्ला / ग्वाल्हेर किल्ला / गोलकोंडा किल्ला / आग्रा किल्ला / फतेहपुर शिक्री किल्ला / दिल्लीचा लाल किल्ला* इत्यादी बरेच किल्ले बघण्याची मला संधी आली. तसेच मी बरेचदा *प्राचिन ऐतिहासिक स्थळांना* भेटी दिलेल्या आहेत. काही प्राचिन *"ऐतिहासिक स्थळे"* ही बघतांना माझे मित्र सोबत होती. जंगल / नद्या / धरण / प्रेक्षणीय स्थळे बघण्याचीही मला खुप सवय आहे. तेव्हा मात्र *"मित्र सोबतीच्या आठवणी"* ह्या जीवंत होत असतात.
राष्ट्रवाद ह्या शब्दातील *"राष्ट्र"* (Nation) हा शब्द खरे तर *"जन समुह ह्यासोबतचं भौगोलिक सीमा ह्या संबंधात जोडण्यात येतो."* परंतु *"राष्ट्र (Nation) आणि देश (Country)"* ही दोन विभिन्न अर्थाचे दोन शब्द आहेत, हे समजणे गरजेचे आहे. आणि त्यामध्ये सर-मिसळ होता कामा नये. *"जन समुह आणि भौगोलिक सीमा"* संदर्भ हा *"देश"* ह्या विषयाशी निगडीत आहे. कारण *"सामाजिक / आर्थिक समानता - बंधुता - न्याय - स्वातंत्र"* ही बहु आयामे *"राष्ट्र"* ह्या संदर्भाचा बोध करतात. आपल्या भारत देशात काय ही *"मुल्ये / बहु आयामे"* दिसुन येतात ? हा अहं प्रश्न आहे. *बाबासाहेब डॉ आंबेडकर* ह्यांचे हे बोल खुप काही बोलके आहे. *"भारतीय राज्यघटनेने जरी एक व्यक्ती एक मत यावर आधारित प्रौढ मतदान पध्दतीचा स्वीकार केला असला तरी आर्थिक व सामाजिक बाबतीत ते तत्व अजुनही अंगिकारण्यात आलेले नाही."* (लखनौ १९५१) बाबासाहेब डॉ आंबेडकर हे स्वतः ह्या *"भारतीय घटनेचे शिल्पकार"* आहेत. आपला देश २६ जानेवारी १९५० रोजी *"प्रजासत्ताक "* झाला. बाबासाहेब डॉ आंबेडकर हे २७ सप्टेंबर १९५१ ला *"हिंदु कोड बिल"* संसदेमध्ये पारित न झाल्यामुळे मंत्रीपदाचा राजीनामा देतात. परंतु बाबासाहेब डॉ आंबेडकर हे *"भारतीय संविधान"* मंजुरी चर्चेमध्ये २६ नोव्हेंबर १९४९ ला *"संविधान सभेत"* (Constituent Assembly) मध्ये चर्चेला उत्तर देतांना म्हणतात, *"On 26th of January 1950, we are going to enter into a life of contradictions. In politics we will have equality and in social and economic life we will have inequality. In politics we will be recognising the principle of one man one vote one value. In our social and economic life, we shall, by reason of our social and economic structure, continue to deny the principle of one man one value. How long shall we continue to live this life of contradictions ?"* भारताने प्रजासत्ताक संदर्भाचे *(संविधान संस्कृती)* ७५ वर्ष पुर्ण केलेले असतांना, खरोखरच काय आम्ही ह्या दिशेने खरोखर मार्गक्रमण केलेले आहे काय ? दुसरा संदर्भ हा *"भारतीयत्व भावनेचा"* आहे. भारतीय सत्तानीतिने *"भारत राष्ट्रवाद मंत्रालय किंवा संचालनालय"* ह्याची निर्मिती केली आहे काय ? भारतीय बजेटमध्ये *"आर्थिक प्रावधान"* केले आहे काय ? हा प्रश्न आहे. बाबासाहेब डॉ आंबेडकरांचे हे बोल आम्हाला *"भारत राष्ट्रवाद"* विचारांकडे घेवुन जातांना दिसतात. *"भाषा, प्रांतभेद, संस्कृती वगैरे भेदभाव मी कधीचं पाळु इच्छीत नाही. प्रथम हिंदी नंतर हिंदु किंवा मुसलमान हेही तत्व मला पटत नाही. सर्वांनी प्रथम भारतीय, शेवटी भारतीय, भारतीयाच्या पलीकडे काहीचं नको, हीच माझी भुमिका आहे."*(मुंबई, १ एप्रिल १९३८) असा "भारत राष्ट्रवाद " आमच्या किती (?) राजकीय नेत्यांनी जोपासला आहे ??? हा प्रश्न आहे. *"देशद्रोही "* हा शब्द मात्र त्यांच्या भाषणात विशेषत: दिसून येतो, ह्याला काय म्हणावे ?
बुध्द साहित्य हे बुध्द विचारधारेची परिसीमा आहे. सिंधु घाटी सभ्यता पहिला बुद्ध *ताण्हणकर बुद्ध* पासुन २८ वे *शाक्यमूनी सिध्दार्थ बुद्ध* (इ. पु. सातवी - सहावी शती) अशी लांब बुद्ध परंपरा आहे. सिंधु घाटी सभ्यता ही *"विकसित नगरीय सभ्यता"* होती. तेव्हा १५०० च्या वर शहर होते. प्राचिन भारत ही मोठी *"आंतरराष्ट्रीय व्यापार पेठ"* होती. आंतरराष्ट्रीय *"शिक्षणाचे केन्द्र"* ही होते. प्राचिन इतिहास हा *"अखंड भारत राष्ट्रवाद"* कथन करुन जातो. बौध्द वर्गानी पारंपारिक स्थापित राजकिय अधिकाराचा जवळचा संबंध ठेवलेला आहे. ज्याचा अर्थ *"राजेशाही - सत्ताशाही"* हा होतो. आणि बुध्द धर्माला तेव्हा *"राजाश्रय"* मिळाला होता. १९व्या शतकात जेव्हा राष्ट्र - राज्यांची जागतिक व्यवस्था ही गंभिरपणे विकसित होवु लागलेली होती, तेव्हा काही बौध्दमय राष्ट्रांनीही राष्ट्रवाद ह्या कल्पनामध्ये गुंतण्यास सुरुवात केली होती. *"राष्ट्राची रेषीय, प्रगतीशील आणि मुलंतत्ववादी कल्पना"* ही एक आधुनिक कल्पना वाटायला लागली. राष्ट्रवाद संदर्भात खालील आयामांना ह्यासोबत जोडताही येवु शकते. आजच्या विश्व आर्थिक विकासमय (?) युगात *"जागतिक औद्योगिकीकरण / सामाजिक - आर्थिक मुल्य विकास वृध्दी / औद्योगिक विज्ञान - तंत्रज्ञानाचा विकास / रोजगार निर्माणातुन असंतोष मुक्ती होणे / आर्थिक समृद्धी / जन मन विश्वास भावना रुजविणे / देशाप्रती आदरभाव"* ही आयामें महत्वपूर्ण झाली आहेत. बौध्द विचार शाळांची उभारणी गरजेचे आहे. *"आधुनिकता आणि राष्ट्रवाद"* तसेच *"बौध्द धर्म आणि राष्ट्रवाद"* ह्यामध्ये एक आत्मियता भाव निर्माण व्हायला हवा. *"द्वेष राजनीति"* ही राष्ट्रवादातील मोठा अडसर आहे. भारत आज ज्याप्रकारे *"धर्मांध राजनीति"* सीमेतुन जात आहे, ती सीमा उद्या *"लोकशाहीचा डोलारा उध्वस्त"* केल्याशिवाय राहाणार नाही. भारत राष्ट्रवादाला उतरती कळा ही *"दहाव्या शतकातील वैदिक ब्राम्हणी व्यवस्था"* ह्यापासुन सुरू झाली. आणि भारतीय राजसत्ता नीतिने *"पुंजीवादी व्यवस्था हाताशी धरणे,"* हे भविष्यात भारताला *"आर्थिक दिवाळखोरीत"* पाडण्याचे संकेत आहेत. *"मंदिर अर्थव्यवस्था"* ही शासन निगडित असणे फार गरजेचे असुन, *"मंदिराचे राष्ट्रियकरणं"* ह्या दिशेने जायला हवे. भारतीय अर्थव्यवस्था ही तळागळाला जात असताना *"विदेशी कर्ज व्यवस्था"* ही भारताला तारणे अजिबात शक्य नाही. *"डॉलर मुद्रा व्यापारातुन रुपयांचे मुल्यांकन वाढणार काय ?"* हा संशोधनाचा विषय आहे. *"भारत राष्ट्रवादाचे गमक"* बुध्दमय भारत आहे. *"संविधान संस्कृतीने"* भारताला प्रजासत्ताक केलेले असतांना *"भांडवलशाही राक्षस"* हा लोकशाहीला गिळंकृत करण्याच्या मार्गावर असतांना, *"न्याय व्यवस्था"* ही शांत कां आहे ? हा मोठा प्रश्न आहे. कारण *"सर्वोच्च न्यायालय"* ही भारतीय संविधानाची कस्टोडियन आहे. ती *"वॉच डॉग"* आहे. प्रश्न हा की, *"न्याय व्यवस्थेचा हाठोडा हा पडणार कधी ?"* भारत सत्ता नीति *"भारत राष्ट्रवाद"* समजणार कधी ?
जय भीम !!!
-------------------------------------------
▪️ *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*
नागपूर, दिनांक २४ नोव्हेंबर २०२५
No comments:
Post a Comment