👌 *भीम सुर्याचा जन्म झाला !*
*डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*
मो. न. ९३७०९८४१३८
नको छेडु रे ती तार माणसी वेदनांना
आता इथे भीम सुर्याचा जन्म झाला...
परंपरेच्या आलेल्या ह्या दु:ख यातनांना
बुध्दाच्या विचारातुन क्रांती बोध झाला
पुनश्च आलेल्या पेशवी गुलामी पाशांना
ह्या राजा राणी बंधनातून तो मुक्त झाला...
हे अहिंसा करुणा ती मनात रुजवितांना
बुध्द प्रेम मैत्रीचा संदेश हा जागृत झाला
युध्द की बुध्द हा विवाद जगी रे पेटतांना
बाबांच्या दीक्षा बोध क्रांतीचा उदय झाला...
भीमा कोरेगाव युध्दाची झलक पाहतांना
तुझ्या सारखे छप्पन हा इतिहास झाला
बाबांनी आपल्या त्या क्रांतीला पेलतांना
महार शौर्याचा तो इतिहास जागृत झाला...
------------------------------------------
नागपूर दिनांक ५ नोव्हेंबर २०२५
No comments:
Post a Comment