👌 *हे प्रिये ....!!!*
*डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*
मो. न. ९३७०९८४१३८
हे प्रिये
प्राचीन इतिहासाला
तु सहज समजुन
विसरुन जावु नकोस
सत्य इतिहास
हा लपविला गेला आहे
प्राचीन इतिहासावर
बलात्कार करुन
ब्राह्मण्य बलात्कार इतिहास
हा रचला गेला आहे
आणि ती बलात्कार परंपरा
अव्याहत सुरु आहे
तु त्याच्या प्रेमात पडुन
स्वता:चे वाभाडे काढु नकोस
ह्या प्राचीन इतिहासाची साक्ष
चक्रवर्ती सम्राट अशोकाचे
शीलालेख शीलास्तंभ आहेत
ही ताडपत्र - ताम्रपट
प्राचीन इतिहास आहेत
कागदाचा शोध
इसवी दहाव्या शतकात
चीन देशाने जगाला दिला
तेव्हा आता तु
हा इतिहास समजुन घे
बुध्द हे सत्य आहे
सत्य हे प्रेम मैत्री आहे
बंधुता करुणा अहिंसा आहे
सत्य ही प्रज्ञा आहे....!!!
-------------------------------
नागपूर दिनांक ४ ऑगस्ट २०२५
No comments:
Post a Comment