Sunday, 24 August 2025

 📓 *प्रकाश बनसोड द्वारा संपादीत पुस्तिका डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्यावर संशोधन नावाने प्रा. प्रदीप आगलावे ह्याचा विभागीय आर्थिक भ्रष्टाचार !*

        *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य''* नागपूर १७

राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल 

एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु मप्र 

मो. न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२


            ‌पॅंथर *प्रकाश बनसोड* हा आंबेडकरी चळवळीपासुनचा माझा फार जुना मित्र आहे. चार - पाच दिवसांपूर्वी प्रकाश बनसोड हा तेव्हा माझ्याकडे आला. तसा प्रकाश हा कधी कधी माझ्याकडे येत असतो. आणि तो माझ्या घरी आल्यानंतर प्रकाश बनसोड संपादीत केलेल्या *"डॉ बाबासाहेब आंबेडकरांवर संशोधनाच्या नावाखाली फसवणूकीचा फंडा"* ही ८० पेजची पुस्तिका प्रकाश बनसोड ह्यानी मला भेट दिली. माझ्या खुप व्यस्ततेमुळे मी सदर पुस्तिकेवर माझे *"समिक्षक लेखण"* करु शकलेलो नाही. परंतु आज वेळ काढुन मी समिक्षा लिहितो आहे. सदर पुस्तिका ही रातुम नागपूर विद्यापीठातील *"डॉ. आंबेडकर अध्यासन"* (Dr. Ambedkar Chair) विभागातील माझा खुप जिवलग मित्र *प्रा. डॉ. प्रदीप आगलावे* ह्यांच्या *"आर्थिक (?) भ्रष्टाचाराची"* ती गाथा आहे. तशी *"प्रदिप आगलावे आणि माझी मैत्री"* ही माझ्या घरी ४ - ५ वर्षांपर्यंत *"एका प्लेटमध्ये जेवण"* करणे इतकी घनिष्ठ राहिलेली आहे. *"प्रदिप आणि सरोज आगलावे ह्यांचा लग्नाचा"* मी मध्यस्थ ही आहे. प्रदीप - सरोज ह्यांच्या *"सुख-दु:खाचा मी सखा सुध्दा"* आहे. प्रदिप आगलावे ह्याच्या *"ब-याच गोष्टीतील"* मी साक्ष सुध्दा आहे. परंतु *"बुध्द  - आंबेडकरी निष्ठा पाईक"* असल्यामुळे प्रदिप आगलावे ह्याच्या अशा चुकांवर मी गप्प बसणे, हा विचार मला पटलेला नाही. म्हणुन माझा जिवलग मित्र *प्रदिप आगलावे* ह्यांच्या आर्थिक भ्रष्टाचार सदर्भातील पुस्तिकेवर मी समिक्षा लिहित आहे. प्रकाश बनसोड संपादीत पुस्तिका वाचतांना आधी मला असे वाटले की, माझा जिवलग मित्र *प्रा. डॉ. प्रदीप आगलावे* ह्याच्यावरील आरोपांची कहाणी असावी. परंतु संपुर्ण पुस्तिका वाचल्यावर प्रा प्रदिप आगलावे ह्याच्यावर नागपूर विद्यापीठाचे *"कुलगुरु"* ह्यांनी प्र-कुलगुरु *डॉ. राजेंद्र काकडे* अध्यक्षतेखाली *प्रा. डॉ. विजयता उइके / प्रा. डॉ. निरज बोधी* (सचिव) ही तिन सदस्यीय समिती गठित करुन *प्रकाश बनसोड* ह्यांनी लावलेल्या *"आर्थिक भ्रष्टाचार आरोपांची"* सहीनिशा ही सदर तिन सदस्यीय समितीने केली असुन, *"प्रा. डॉ. प्रदिप आगलावे ह्यांनी आर्थिक भ्रष्टाचार केल्याचा अहवाल"* (आवश्यक मंजुरी न घेता रु. १०,२३, ९५०/-  पैकी *रु. ७,५०,०००/- अफरातफर*) नागपूर विद्यापीठाला दिनांक ११/०३/२०२५ रोजी सादर केला आहे. प्रकाश बनसोड ह्यांनी लावलेले आर्थिक आरोप हे फार गंभिर असुन, कंटिजंसी हेडमधुन *"चड्डी - बनियान खरेदी रु. ७९६ /-"* संदर्भात *"खरेदीचा हेतु हा स्पष्ट होत नाही"* हा तिन सदस्यीय समितीचा शेरा मला खुप अस्वस्थ करुन गेला. माझा जिवलग मित्र प्रदिप हा *"चड्डी - बनियान खरीदी बिल रु ७९६/-"* आपल्या विभागाकडुन घेत असल्यास *"प्रदिपचा भिकारडेपणा"* हा मला शांत राहु द्यायला तयार होई नां !!!

           *"डॉ. बी. आर. आंबेडकर अध्यासन"* ह्या विभागात *"संशोधन"* करण्याच्या नावावर *"रु. ७,५०,००० /-  ची अफरातफर"* करणे / बामसेफ ह्या संघटनेच्या *आंतरराष्ट्रीय परिषद लंडन"* (युं.के.) येथिल सहभागाचे वैयक्तिक निमंत्रण असतांना सदर खर्च *डॉ आंबेडकर अध्यासन* ह्या आपल्या विभागाकडुनचं स्वत: - सही करुन *"रु. ५०,००० /- प्रवास खर्च"* हा वसुल करणे / डॉ. आंबेडकर फाऊंडेशन नवी दिल्ली ह्यांना *"संशोधन प्रकल्पाचे ५०० पानांचे चार खंड"* प्रकाशित केल्याचा *"खोटा अहवाल"* सादर करुन सदर *"चार संशोधन खंड प्रकाशित न"* करणे / सदर विभागामध्ये विभिन्न प्रकाशन खर्च दाखवुन *"नोटशीट न लिहिता - बगैर बिल* खर्च दाखविणे / नागपूर विद्यापीठातील हा *"आर्थिक घोटाळा"* केवळ डॉ बाबासाहेब आंबेडकर अध्यासन विभागापर्यंत मर्यादीत आहे की हे *"भ्रष्टाचार लोण ब-याच विभागात"* पसरलेले आहे ? *"चार्टर्ड अकाउंट"* हा काय तपासणी करतो ? अशी बरीच प्रश्ने ही उपस्थित होत आहेत. *"कारण हा जनतेचा पैसा आहे."* पैशाचा असा दुरुपयोग आपण सहन करता कामा नये ? नागपूर विद्यापीठाच्या *"तीन सदस्यीय समिती"* मध्ये आधी डॉ आंबेडकर अध्यासन विभागाचे आताचे विभागाध्यक्ष *प्रा. डॉ. अविनाश फुलझेले* ह्यांना समिती सचिव म्हणुन नियुक्त करण्यात आलेले होते. परंतु *प्रा. डॉ. अविनाश फुलझेले* ह्यांनी प्रा डॉ प्रदिप आगलावे ह्याच्या सोबत *"नातेसंबंध"* असल्याचे सांगुन सदर समितीतुन बाहेर पडण्याचा घेतलेला निर्णय अतियोग्य असा होता. *मी सुध्दा* सदर विभागाचा *"विभागाध्यक्ष"* असतो तर, माझा सुध्दा ही प्रा. फुलझेले प्रमाणेच निर्णय असता. न्यायालयातील न्यायाधीश सुध्दा *"नातेसंबंध केस"* असल्यास सदर केस ही *"माझ्या समोर नको"* ही नैतिकता पाळीत असतात.

            ‌प्रा. प्रदिप आगलावे ह्याचे जन्म स्थळ *सेवाग्राम* आहे. प्रदिप ह्याच्या घरची आर्थिक स्थिती ही हलाकीची होती. सेवाग्राम येथे प्रदिप आगलावे ह्याचे झोपडीवजा घर होते. प्रदिप ह्याला गांधी आश्रम समितीने *"गांधी आश्रमात"* राहायला एक खोली दिलेली होती. प्रदिप हा विद्यार्थी दशेमध्ये असतांना *"खादी कपडेधारी"* होता. मला प्रदिपच्या मैत्री कारणाने सेवाग्राम येथे *"३ - ४ वेळा जाण्याचा योग"* आलेला होता. प्रदिप हा आमच्या संपर्कात आल्यावर *"आंबेडकरी विचारांवर"* बोलायला लागला. प्रदिप ह्यांचा संघर्ष मी जवळुन बघितला आहे. आज प्रदिप आगलावे हा *"आलिशान घरात"* राहातो आहे. सी सेगमेंट *"कार"* ही प्रदिपकडे आहे. प्रदिपचा मासिक पगार हा *"दीड ते दोन लाख"* असावा. सरोज हिचा ही मासिक पगार सुद्धा *"सव्वा ते दिड लाख"* असावा. आर्थिक मासिक आय ही जवळपास *"तिन ते साडे तिन लाख"* असतांना प्रदिप आगलावे हा *"डॉ बाबासाहेब आंबेडकर अध्यासन"* विभागात *"पैश्याच्या अफरातफर"* ह्यामध्ये संलग्न होणे, हा विचारचं माझ्या मनाला अस्वस्थ करुन जातो. मी *"जागतिक बौध्द परिषद २००६"* चे आयोजन केले असतांना जी मंडळी मोठ्या मोठ्या गोष्टी सांगित असतं, त्यांनी सदर परिषदेला आर्थिक मदत केलेली नव्हती. माझा शेतीचा सौदा झालेला होता. परंतु सदर *"जागतिक बौध्द परिषद"* सफल होण्याकरीता *"शेतीचा सौदा रद्द"* करुन संपूर्ण पैसा जागतिक बौध्द परिषदेला लावलेला होता. पुढे *"जागतिक बौध्द परिषद २०१३"* चे आयोजन करतांना ही, कामठी रोडवर *"मिसेसला तिच्या जन्म दिवसांची भेट"* म्हणुन *"फ्लॅटचा सौदा"* केलेला होता. परंतु जागतिक बौध्द परिषद सफल होण्याकरीता *"फ्लैटचा सौदा रद्द"* करुन तो संपूर्ण पैसा सदर जागतिक बौध्द परिषदेला लावलेला होता. तैवान देशातुन माझ्याकडे ४ वेळा आलेल्या धम्म पुस्तकावर मला *"रु २ - ३ लाख खर्च"* आलेला होता. परंतु मी ती पुस्तके धम्म बांधवांना मोफत दिली होती. हा सर्व माझा मुर्खपणा होता, असे काही मंडळी म्हणतील. आज ही मी *"सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल"* तर्फे होणा-या ब-याच कार्यक्रमाचा खर्च स्वतः वहन करीत असतो. माणसांनी पैश्याचा मागे अति प्रमाणात धावु नये. मला चवथे बुध्द *"दिपांकर बुद्ध"* ह्यांनी सुमेध व्यापारी ह्याला म्हटलेले शब्द आठवण करुन जातात. *सुमेध* ह्या व्यापा-याने आपली संपूर्ण संपत्ती *"प्रजेला दान केल्याचा इतिहास"* आहे. आयुष्यासाठी माणसांनी पैसा संग्रह हा करायला हवे. *"परंतु माणसांनी अति पैश्याच्या मागे धावावे काय ?"* हा ज्याच्या त्याच्या स्वयं इच्छेचा प्रश्न आहे. परंतु विभागातील *"पैश्यावर हात साफ करणे"* ....???? प्रदिप आगलावे ह्याच्यावर तिन सदस्यीय समितीने *"भ्रष्टाचार आरोप"* केल्याचा अहवाल दिल्यामुळे, प्रदिप आगलावे ह्यांनी नैतिकता स्वीकारून *"दीक्षाभूमी स्मारक समितीच्या सदस्य"* पदाचा राजीनामा द्यायला हवा ! बाकी सर्वस्वी निर्णय हा प्रदिपचाचं आहे‌ !!!


-----------------------------------------

▪️ *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*

        नागपूर दिनांक २४ अगस्त २०२५

No comments:

Post a Comment