Wednesday, 9 April 2025

 https://kutumbapp.page.link/MaK7CpCDTgzxo4xp8

🤝 *भीम नाद जगात रे !*

      *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*

       मो. न. ९३७०९८४१३८


प्रज्ञेची पाकळी फुलली ह्या बुध्द फुलात रे

चंद्र शीतल किरणांचा भीम नाद जगात रे...


दु:खीतांची वेदना ही माणसांच्या हृदयी रे

कठोर झाला हा माणुस पांढरपेशा वर्ग रे

जल्लादांची सत्ता आली ह्या भारत भुमी रे

आता तरी उठा भीम बाबांच्या संविधाना रे...


हे बुध्दाची करुणा हवी ह्या माणसी मनी रे

कुठे हरपली बुद्ध चेतना ना दिसे हे जगी रे

हर कुणी झाला स्वार्थी हे पैस्याच्या नादी रे

पैसा ना येणार सोबत हे मरणाच्या मडी रे...


फुलांच्या फुलपाखरांची प्रेम मैत्री सच्ची रे

फुलांच्या मधु गंधातुन तुमचे नाते झाले रे

निष्पाप तुमच्या जीवनात ना कुणा वैरी रे

माणसांच्या सोबती परी तुझी साथ हवी रे...


----------------------------------------

नागपूर दिनांक ७ एप्रिल २०२५

No comments:

Post a Comment