.📓 *बाबा तुम्ही ...!*
*डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*
मो. न. ९३७०९८४१३८
बाबा तुम्ही भारतीय घटनेचे शिल्पकार झाले
कोटी कोटी मनात ह्या जीवनाचे आधार आले...
पेशवाई युगी आम्हा तोंडाखाली गाडगे आले
कमरेला झाडु बांधुनी ते गरिबीचे दिन झाले
ना चांगले घर ना गाडी झोपडीत वास आले
भीमा कोरेगाव क्रांतीतुन तुम्हीचं याद झाले...
शाळा शिकतांना आम्हाला लई लई कष्ट झाले
पण तुझ्याचं शिका मंत्राने आम्हास जाग आले
संघर्ष करणा-या ह्या माणसाला तुचं उभे केले
संविधानी आरक्षणा आम्हा आर्थिक बळ आले...
रमाई सोडुन जाता तुमच्या डोळ्या अश्रू आले
हे सावरता सावरुन भारताला संविधान दिले
स्त्री समानतेची वाट हिंदु कोड बीलातुन आले
बरबटलेल्या विचाराला मात क्रांती बुद्ध झाले...
------------------------------------------
(बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती पर्वावर)
नागपूर, दिनांक ११ एप्रिल २०२५
No comments:
Post a Comment