🌜 *मालवली ही सांज... !*
*डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*
मो. न. ९३७०९८४१३८८
मालवली ही सांज त्या गोड आठवणींची
बुध्दाच्या करुणेतुन साद दिली शांतीची...
उद्याची ती रात्र आहे वै-याच्या ही शक्तीची
आता तरी जागा हो चेतना जागवं मनाची
काळ वेळ आहे ही बुध्दीच्या रे कसोटीची
जागा झाला नाही तर सर्वस्व नाश पणाची...
वर्षाच्या वर्षावातुन समृध्दी झाली मातीची
मातीच्या ह्या कणातुन उगवे झाडी विश्वाची
प्रेमाची साद ती सहज फुलली ही भावनेची
आठवणी साक्ष आहे इतिहासाच्या भिंतीची...
फुलांच्या फुलण्यातुन रात्र झाली गंधाची
मधु गंधाचा साक्षीतुन प्रेम वर्षा ही भुंग्याची
हे भुंग्या हा हात दे साद ती फुलपाखरांची
प्रेमाची हुंकारी ती विश्व शांतीच्या क्रांतीची...
-----------------------------------------
नागपूर दिनांक ७ एप्रिल २०२५
No comments:
Post a Comment