🌹 *ह्या निसर्ग बागेतील !*
*डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*
मो. न. ९३७०९८४१३८
ह्या निसर्ग बागेतील असो वा
आपल्या घरच्या बागेतील
विविध प्रकारच्या फुलांचे फुलणे
रंगी बिरंगी फुलांचा मोहक सुगंध
फुलपाखरांचे मनसोक्त बागडणे
आवाजी भुंग्यांची ती सोबत
त्यांनी फुल रजोकणांचे आस्वाद घेणे
ह्या चिमुकल्या लव्ह बर्डचे
फुलांच्या झाडावर बागडणे
माझ्या घरच्या झुल्यावर बसुन
निसर्गाचा आनंद घेत असतांना
निसर्ग प्रेमात न्हावुन जात असतो ...
निसर्गाचे हे निरागस रुप
मी माणसात शोधित असतो
गुलाब फुलांच्या पाकळ्यांचे
झाड परिसरात बिखरणे असो
त्या बिखरलेल्या पाकळ्यांचा
मोहक गंध तेव्हाही कायम असतो
सोबतीला मोगरा तो असतोचं
रोज सकाळी त्या फुल पाकळ्यांना
एकत्रीत जमा केल्यावर
माझ्या अंगणातील बुध्दासमोर
त्या पाकळ्यांना अर्पित झाल्यावर
बुध्दाला त्रिवार वंदन करीत असतो
दहा मिनिटे डोळ्यांच्या बंद करण्याने
असलेले संपूर्ण दडपण दुर होते
मन प्रफुल्लीत होवुन जाते
मानसिक शांतीची अनुभुती होते
आणि माझ्या रोजच्या जीवनाची
नेहमीची ती सुरुवात असते ...!
*********************"
नागपूर दिनांक २०/०३/२०२५
No comments:
Post a Comment