Wednesday 11 October 2023

 👌 *अनिच्चा वत संखारा...!*

       *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*

       मो. न. ९३७०९८४१३८


आयुष्याच्या दोरीचा लगाम

हा माणसाच्या हातात आहे 

हे जरी सत्य असले तरी

ते पुर्ण सत्य नाही

कधी कधी हा लगाम

भविष्यात काय करणार आहे ?

हे माणसाला सांगता येत नाही...

निसर्गाचे सत्य म्हणजे

पृथ्वीवर जीव आहे

आणि ह्या जीवात 

चेतना वास करीत असते

पण त्या चेतना शक्तीला

दुखवुन कधी चालणारे नाही

चेतनेला समजुन घ्यायचे आहे‌‌...

मृत्यु हे चिरकाल सत्य आहे

माणसाला आपल्या आयुष्यात 

काय करायचे आहे ? 

हा महत्वपुर्ण निर्णय 

माणसाला घ्यायचा असतो

तेच माणुसत्व असणार आहे

कार्यकारण भाव सिध्दांत‌ आहे...

बुध्द जीवनाच्या संदर्भात

भिक्खुंना उपदेश करतात की

अनिच्चा वत संखारा

उप्पादवय धम्मिनो |

उप्पज्जित्वा निरुज्झन्ति

तेसं वूपसमो सुखो ||

सर्व संस्कार नाशवंत आहेत

तुम्हाला अप्रमादी राहुन

आपल्या मुक्तीसाठी प्रयत्न करा

अर्थात सुख आस्वाद घ्यायचा आहे

कुशल जीवन हे जगायचे आहे...


* * * * * * * * * * * * * * *

नागपूर, दिनांक ११ आक्टोंबर २०२३

No comments:

Post a Comment