Friday 11 November 2022

 ✍️ *आजवर आपण खुप भांडलो, आता समन्वय, एकमेकांना समजुन घेण्याची गरज आहे !*  इति - *शरणकुमार लिंबाळे 'दलित'* (दलित उचल्याकार साहित्यिक)

    *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'* नागपूर १७

राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल

मो.न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२


     *"आजवर आपण खुप भांडलो. आता समन्वय, एकमेकांना समजुन घेण्याची गरज आहे."* हे विधान आपण नाकारावे, असे हे विवादीत विधान नाही. परंतु तो *"समन्वय - एकमेकांना समजुन घेणे"* हे कुणासोबत असावे ? कधी असावे ? कां असावे ? कोणत्या मर्यादेत असावे ? ह्या संदर्भात काही मर्यादा आहेत. त्या मर्यादेची जोपासना करणे, हे ही गरजेचे आहे‌. आणि त्या मर्यादाचे उल्लंघन होता ही कामा नये. सदर विधान हे आपल्या समुदाया संदर्भात आणि आपली नाती घनिष्ठ करणारा असेल, आपल्या ह्या समुदायाचा *उत्थानाचा मार्ग* असेल, आपल्या समुदायाला घट्ट बळकटी आणणारा असेल तर, त्या विधानाचे आपण सहर्ष स्वागत केले असते. परंतु सदर विधान हे *दलित - दलितत्व साहित्य / चळवळ ह्याची बांधिलकी जपणारे (आंबेडकरी - बौध्द साहित्य नाकारणारे)* / सरस्वस्ती साहित्य पुरस्कार स्विकारणारे, *"ललित - इहवादी साहित्याची"* मैत्री भाषा बोलणारे - *शरणकुमार लिंबाळे 'दलित'* (मुंबई) ह्या महाभुताने (?) नुकतेचं नागपुरात काढले. लिंबाळे ह्या दलिताच्या सदर विधानावर लिहिण्याचा माझा दोन - तिन दिवसापासुन‌ तसा प्रयत्न सुरु होता. परंतु माझी कामाची असलेली व्यस्तता आणि मध्येच *"आर्थिक आरक्षण"* हा सर्वोच्च न्यायालयाचा आलेला निर्णय - ह्या कारणामुळे मी आधी *"आर्थिक आरक्षण"* ह्या महत्वपुर्ण विषयावर लिखाण केले आहे. आता *"दलित साहित्याची (?) शस्त्रक्रिया"* करण्याच्या संदर्भाने, माझ्या लिखाणाला मी वाट मोकळी करुन दिली.

    दलित साहित्यिक - शरणकुमार लिंबाळे  हे जे नागपुरात दलितत्व ओकले. त्याबद्दल अजुन थोडे अधिक विधान बघु या. लिंबाळे ओकतांना बोलुन गेले की, *"गरज संपली म्हणुन आंदोलने संपलीत.‌ आता गरज संवादाची आहे. मी हिंदुना पुर्वी शत्रु समजायचा आणि ब्राम्हणांना शिव्या द्यायचा. पण अशा भांडणात आयुष्याची साठी उलांडली. आमच्यावर ह्या अश्या संस्काराचा दबाव असायचा. आणखी किती भांडखोर व्हायचे‌ ? आम्ही इतरांना मित्र म्हणुन कां बरे समजुन घेवु शकत नाही ? आजवर खुप भांडलो. आता समन्वय, एकमेकांना समजुन घेण्याची गरज आहे."* अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या वतीने ६ नोव्हेंबर २०२२ रोजी, दीक्षाभूमी परिसरातील *"दि ब्लाईंड रिलिफ असोशिएशन"* ह्यांच्या वतीने "नवदृष्टी सभागृहात" दलितत्व मिरविणारे, लिंबाळे दलित सदर विधान बोलुन गेले. आता दलित - लिंबाळेच्या सदर विधानाची शुध्द पध्दतीने शस्त्रक्रिया करु या.

    शरणकुमार लिंबाळे 'दलित' ह्याच्या सदर विधानाची शस्त्रक्रिया, मी बाबासाहेब डॉ. आंबेडकर ह्यांच्या ह्या दोन विधानाने करतो.‌ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात , *"भारताचा धर्म नेहमीसाठी हा हिंदु धर्म होता, हे मत मला मान्य नाही. हिंदु धर्म हा तर सर्वात शेवटची, आणि विचारांची उत्क्रांती होत असतांना उदयास आलेला आहे. वैदिक धर्माच्या प्रचारानंतर, भारतात तिन वेळा धार्मिक परिवर्तन घडुन आलेले आहे. वैदिक धर्माचे रुपांतर ब्राम्हण धर्मामध्ये झाले आणि ब्राम्हण धर्माचे रुपांतर हिंदु धर्मामध्ये झाले."* (कोलंबो, ६ जुन १९५०) प्रश्न आता हा आहे की, ब्राम्हणी धर्माचे रुपांतर हिंदु धर्मामध्ये झाल्यानंतर, *सर्वच्या सर्व हिंदु हे ब्राम्हण कां नाहीत ?* आणि भारतात जाती व्यवस्था निर्मितीची ब्राम्हणी समाजाला गरज कां भासली ? महत्वाचे सांगायचे म्हणजे "दलित" हे सुध्दा हिंदुच आहेत. मग शरणकुमार लिंबाळे हे हिंदुना शत्रु समजण्याचे कारण ??? बाबासाहेब डॉ. आंबेडकर हे शिस्त आणि प्रामाणिकपणा ह्या गुणा संदर्भात म्हणतात, *"शिस्त आणि प्रामाणिकपणा ह्या दोन‌ गोष्टी आपल्या कार्यकर्त्यांमध्ये असणे विशेष जरुरीचे आहे. फेडरेशनच्या धोरणाविरुध्द उघडपणे व गुप्तपणे काम करणा-यास फेडरेशनमध्ये अजिबात स्थान नाही. तसेच, संघटनेची ताकद ही केवळ सभासदांच्या संख्येवरचं अवलंबुन नसुन सभासद वर्गाच्या प्रामाणिकपणावर, संघटनेच्या एकनिष्ठतेवर आणि शिस्तपालनावर अवलंबुन असते."* (नवी दिल्ली, २५ मार्च १९५३) आता प्रश्न असा की, आम्ही असो की शरणकुमार लिंबाळे असो, आम्ही प्रामाणिकपणा, शिस्त आणि एकनिष्ठता ह्या गुणांशी किती अंशी बांधिल आहोत ? *"आता गरज संपली म्हणुन आंदोलने संपली."* शरणकुमार लिंबाळेंच्या ह्या विधानाबद्दल काय बोलावे ??? त्यांना *"अर्थशास्त्र"* माहित नसावे. *"माणसाची गरज ही न संपणारी गोष्ट आहे. उलट गरज ही वाढतचं जात असते."* आपली आंदोलने होत नाहीत, अश्यातली गोष्ट नाही. ती बघायला दृष्टी हवी असते. *आंदोलने ही अनेक प्रकारची असतात.* कधी तर ती रस्त्यावरची असतात.‌ तर कधी कागदावरची असतात. तर कधी ती वैचारिक ही असतात. असो.‌ आता मैत्री ह्या विषयावर आपण बोलु या !

      आम्ही बुध्द विचारांची / बुध्द - बौध्द साहित्याची कास धरणारी माणसे आहोत. डॉ. ‌बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी बुध्दाचे बोट धरुन आम्हाला त्या मार्गाचा अवलंब दिला. बुध्द म्हणतात, *"पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि |"* (अर्थात - मी जीव हिंसेपासुन अलिप्त राहाण्याची प्रतिज्ञा करतो.) अर्थात बुध्द सकारात्मक मैत्री कर्म करण्याचा उपदेश देत आहेत. बौध्द धर्मात सब्बसुख गाथेत म्हटलेले आहे की, *"सब्बे सत्ता सुखी होन्तु, सब्बे होन्तु च खेमिनो | सब्बे भद्रानि पस्सन्तु, मा कञ्चि दुक्खमागमा ||"* (अर्थात - सारे प्राणी सुखी होवोत, सर्वाचे कल्याण होवो.‌ सर्वांना हिताचा मार्ग सापडो, कोणालाही दु:ख न होवो.) *"रतन सुत्तात"* म्हटलेले आहे की, *"तस्मा हि भुता निसामेथ सब्बे, मेत्तं करोथ मानुसिया पजाय | दिवा च रत्तो च हरन्ति ये बलि, तस्मा हि ने रक्खथ अप्पमत्ता ||"* (हे सर्व प्राण्यांनो, हे ऐका. मनुष्य जातीवर प्रेम करा. रात्रं दिवस मनुष्य तुमची जोपासना करतात. म्हणुन तुम्ही त्यांचे सावधानपणे रक्षण करा.) ह्या गाथांचा संबंध मैत्री संदर्भात आहे. *बाबासाहेब डॉ. आंबेडकर ह्यांचे समस्त जीवन त्रास - अवहेलना - संघर्षाचे प्रतिक आहे.* तरी सुध्दा डॉ.  बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी बदल्याच्या भावनेतुन काहीच कृत्य केलेले नाही. देशभक्ती / देशभावना जोपासना करण्याचे ते प्रतिक आहेत. अर्थात *डॉ.  बाबासाहेब  आंबेडकर हे "मैत्रेय बुध्द" आहेत."* आणि हा उसाचा किस - दलित शरणकुमार लिंबाळे हा आम्ही बदल्याची राजनीति करतो, असा आपल्यावर आरोप करतो. आणि आम्ही मेलेल्या माणसाप्रमाणे पुर्णत: गप्प आहोत. ह्यापेक्षा शरमेची गोष्ट ही कोणती असु शकते ???

     आंबेडकरी - बौध्द साहित्य / चळवळ ह्या संदर्भात केवळ *शरणकुमार लिंबाळे 'दलित'* हाच केवळ एकमेव साहित्यिक गरळ ओकला, अश्यातला ही भाग नाही. ईहवादी साहित्यिक *डॉ. यशवंत मनोहर* हे महानुभाव *"श्रध्दा / अंधश्रध्दा"* ह्या दोन्ही विषयाला एकत्र जोडुन गरळ ओकुन गेले. बुध्दानी प्रज्ञायुक्त श्रध्देचा पुरस्कार केलेला आहे. *यशवंत मनोहर* हे सुध्दा आंबेडकरी - बौध्द साहित्यिक नाहीत, ह्या संदर्भात मी आधी लिहिलेले आहे. आमचे मित्र / माजी सनदी अधिकारी *इ. झेड. खोब्रागडे* ह्यांनी *"संविधान साहित्य"* ह्या नावाने अलग अशी दुकानदारी उघडण्याचा असफल प्रयत्न केला होता. त्यावेळी मी ह्या दुकानदारीला सक्रिय विरोध केला. कारण *"भारताचे संविधान"* हे *"कायद्याचे पुस्तक"* (Legal Book) नसुन ते अस्सल *"कायद्याचे दस्तावेज"* (Legal Documents) आहे. आणि दस्तावेज कधी साहित्य होवु शकत नाही. नामांकित (?) कवि / आमचे मित्र *लोकनाथ यशवंत* ह्यांनी तर *"आंबेडकरी साहित्याची"* बांधिलकीचं नाकारलेली आहे. तो स्वत:ला *"वादीहिन साहित्यिक"* असेच समजतो. अर्थात तो बिन-बापाची अवलाद वाटायला लागलेला आहे. *शरणकुमार लिंबाळे* ह्याला तर *"सरस्वती पुरस्कार"* हा मोलाचा वाटतो. त्याची प्रेरणा *"दलित साहित्य"* आहे. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी आपल्याला *"बाविस प्रतिज्ञा"* दिल्यात त्याचे काय ? असेच एक विवादीत नामवंत साहित्यिक - *प्रा. रावसाहेब कसबे* ह्यांनी तर मोहनदास करमचंद गांधी ह्यांच्या पुराण विचाराची कास धरलेली दिसुन येत आहे. ते *"गांधीवादी साहित्यिक"* (आंबेडकरी साहित्यिक ?) जास्त आहेत, असे म्हटल्यास अतिशयोक्ती नसावी. असाच एक नाटक्या *प्रा. दिपककुमार खोब्रागडे* हा जागतिक आंबेडकरी साहित्य परिषदेच्या (?) नावाने अवैध व्यवसाय सुरु केलेला आहे. आणि *"पुरस्कार मिळणार"* म्हणुन काही हवसे / गवसे त्याच्या नादाला लागतात. आणि ह्या सर्व मंडळींचा धागा जुडलेला आहे, साहित्य (?) संस्कृती परिषदेचा तथाकथित डॉन / बामनी संस्कृतीचा मोठा आधारस्तंभ - *डॉ.  गिरिश गांधी* ह्या महाभुता सोबत, ज्यांनी *महार* (बौध्द ?) ह्या जातीची मुलगी, त्यांच्या गांधी परिवारात सुन म्हणुन गेलेली असतांना गिरिश गांधी ह्यांनी,  *तु धेडी, हमारे घर में कैसे घुसी ?"* असे म्हणुन तिला घराबाहेर काढलेले होते. आणि आमचे ही साहित्यिक मंडळी *"आर्थिक फायद्याकरीता / डॉ.  आंबेडकर पुरस्कार"* आणि अन्य पुरस्कार मिळण्याकरीता *डॉ. गिरिश गांधी* महाशय ह्यांना अक्षरश: लोटांगण घालतांना दिसुन येतात. ह्याशिवाय मोठी शरमेची गोष्ट काय असणार आहे...? आमच्या ह्या साहित्यिक मंडळींना *"पुरस्काराचा इतकाच प्रेम मोह असेल तर"* त्यांनी आम्हाला सांगावे. आम्ही त्यांच्या करीता *'राष्ट्रिय / आंतरराष्ट्रिय पुरस्कार"* देवुन सन्मान करण्याची उत्तम व्यवस्था करु. परंतु त्यांनी *आंबेडकरी - बौध्द साहित्य / चळवळीची* अवहेलना करने थांबवावे...! ही आमची कळकळीची विनंती आहे...!!!


(मित्रांनो, आपल्याला हा विचार  पटला असल्यास पुढे फारवर्ड करावे. जेणेकरून जास्त लोकांना हे सत्य समजण्यास मदत होईल. मी एक *"आंबेडकरी / बौध्द साहित्याचा - चळवळीचा अभ्यासक"* म्हणुन माझ्या भावनेला वाट मोकळी करुन दिली आहे. गैरसमज नसावा.)

*डॉ.  मिलिन्द जीवने 'शाक्य'* नागपूर

* * * * * * * * * * * * * * * * * * 

(नागपूर, दिनांक ११ नोव्हेंबर २०२२)

No comments:

Post a Comment