Saturday 3 April 2021

 📖 *डॉ. आंबेडकर चरित्र साधन प्रकाशन समिती ह्यावर नव नियुक्त सचिव / सदस्य ह्यांचे आंबेडकरी साहित्याचे मेरिट आणि राजनीतिक नंगानाच...!!!*

          *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य',* नागपूर १७

          राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल

          मो.न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२


      बोधिसत्त्व डॉ. आंबेडकर ह्यांचे १४ एप्रिल २०२१ ला जयंतीचे औचित्य साधुन, महाराष्ट्र शासनाने १ एप्रिलच्या पुर्व संधेला *"डॉ. आंबेडकर चरित्र साधन प्रकाशन समितीवर "* २३ सदस्यांच्या समितीची घोषणा केली. सदर समितीतील नवनियुक्त सदस्यांचे / सचिवांचे नावे बघितल्यावर, त्यातील काही महामहीमांचे आंबेडकरी साहित्यावर लिखाण / चिंतन - वैचारिक लेख वगैरे लिहिल्याचे / साहित्य क्षेत्रात ती *"नामांकित महामहिम असल्याचे"* कधी वाचनात आलेले नाही...! तर काही *"नामांकित मान्यवरांनी तर वयाची सत्तरी"* ओलांडलेली असल्यामुळे, ती मान्यवर सदर समितीवर *"शारीरिक / मानसिक दृष्ट्या सक्षमपणे"* काम करणार काय...? ती मंडळी मुंबईचा लांबचा प्रवास / मुक्काम करुन *"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लिखाण प्रकाशनाला न्याय"* देवु शकणार काय...? हे प्रश्न सहजपणे मनाला विचारू लागले....! दुस-या शब्दात बोलायचे झाल्यास त्या नव नियुक्त सदस्यांना *"राजकिय नेत्यांचा प्रतिनिधीक शोभेचा हत्ती,"* असे म्हटल्यास ते चुकीचे होणार नाही....! आणि *"सचिव* ह्या पदावर नियुक्त केलेले महामहिम तर, शासकिय मेडिकल कॉलेजमधुन, कर्करोग (Cancer Dept.) विभागाध्यक्ष म्हणुन निवृत्त झालेला डॉक्टर...!   सत्तरी ओलांडलेला...! आणि कुणाशीही गोड गोड बोलुन, तसेच नेत्यांच्या पुढे पुढे नाचण्यात एक नंबर पटाईत...! आंबेडकरी साहित्य लिखाणाचा कोणत्याही प्रकारचा गंध नसलेला...!!! *"त्यामुळे  साहिजिकचं आंबेडकरी साहित्याचे लिखाण केलेल्या काही वरिष्ठ /  सत्तरी पार केलेल्या आंबेडकरी साहित्यिकांना, नवनियुक्त सचिव अ-साहित्यिकाच्या हाताखाली काम करणे म्हणजे - इगोचा प्रश्न आला...!"* त्यामुळे साहजिकचं सदर समितीच्या सचिव पदाचा वाद चव्हाट्यावर आला.

     तसे बघितले तर, आपल्या देशातील काही नामांकित देशभक्त मान्यवरांनी, *"भारतीय राजकारण म्हणजे वेश्यालय"* असे खुलेपणाने खेदाने म्हटलेले / लिहिलेलें आहे. अर्थात दुस-या भाषेत सांगायचे म्हणजे त्या देशभक्तांनी, ह्या राजकिय नेत्यांना *"वेश्या"* असे म्हटलेले आहे. परंतु माझे मत मात्र त्या नामांकित मान्यवरांपेक्षा, थोडे वेगळे झालेले आहे. वेश्या ही आपला उदार-निर्वाह करण्याकरीता, आपला व्यवसाय ही चार भिंतीच्या आत, दरवाजा बंद करुन करीत असते. *"ती पुर्णत: नग्न होवुन आपल्या शरीराची नुमाइश ही भर चौकात / भर रस्त्यावर कधीही करीत नसते...!"* दुस-या शब्दात बोलायचे झाल्यास, वेश्या ही कुठेतरी आपल्या स्त्री नैतिकतेचे, पालन करतांना दिसुन येते. परंतु ह्या राजकिय नेत्यांनी मात्र आपली नैतिकता, ही पुर्णपणे विकलेली आहे. ही नेता मंडळी आपल्या फायद्याकरीता, केवळ देशचं नाही तर आपल्या समाजाला ही विकतांना, कुठलीही नैतिकता ठेवत नसतात...! ह्या सत्ता पिपासु माणुस वर्गाने, आपल्या सत्ता प्राप्ती करीता, आपल्या पत्नीला ही जुगारात लावलेले आहे. हा एक इतिहास आहे. तेव्हा ह्या राजकिय नेत्यांना *"वेश्या म्हणने म्हणजे, हा त्या वेशेचा अपमान म्हणावा लागेल...!"* ह्या ना-लायक सतापिपासु नेत्यांमुळे, आपल्या देशाची अर्थव्यवस्था असो की, सु-प्रशासन असो की, देशाची ऐकात्मता - विकास असो, ह्याला पाहिजे त्या प्रमाणांत उभारी, ह्या ७० वर्षातही मिळालेली नाही. *"भारत देशभक्ती विचार"* हा ह्या देशात कधी रुजलाच नाही. *"भारत राष्ट्रवाद मंत्रालय / संचालनालय"* हे ह्या देशात कधी स्थापन झालेलेचं नाही...! वा भारतीय बजेटमध्ये त्याकरिता काही प्रावधान...! त्यामुळे शासनाच्या अशा विभिन्न समितीवर होणा-या विभिन्न पदाधिका-यांच्या नियुक्त्या असो वा, सरकारी पुरस्कार असो, हे सर्व *"राजकिय नेत्यांच्या शोभेच्या हत्तीचे"* प्रतिबिंब आहे, असे म्हणायला काही हरकत नाही....!

       डॉ. आंबेडकर चरित्र साधन प्रकाशन समितीवर झालेल्या नियुक्त्यांना मी वरील संदर्भात घेत असतो. ह्या आधीही *"वसंत मुन"* वगळता, जितके घोडे त्या समितीवर चालुन गेले, *"ते सर्व लग्नाच्या वरातीत नाचणारे घोडे होते. शर्यतीत धावणारे विजेते घोडे नव्हते....!"* आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे जे साहित्य / चरित्र लेखण, आपल्याला दिसुन येते, त्याचे संपुर्ण श्रेय हे केवळ आणि केवळ स्मृतीशेष *वसंत मुन* ह्यांना द्यावे लागेल. कारण त्यांनी डॉ. बाबासाहेबांच्या हस्तलिखितांची व्यवस्थित रित्या जपणुक करुन ठेवलेली होती. माझी (डॉ. मिलिन्द जीवने) बरेचदा त्यांची भेट मुंबईच्या त्यांच्या घरी, तर कधी कधी नागपुरला झालेली होती. एकदा माझ्या निमंत्रणावरून वसंत मुन हे जगन वंजारी ह्यांच्या सोबत, माझ्या काॅलेजच्या कार्यक्रमालाही आलेले होते. तसेचं आमच्या ह्या भेटीत, त्यांनी बरीचं माहिती आम्हाला दिलेली होती. आजपर्यंत त्या समितीवर मंत्री /  संत्री / कुत्री स्वार झाल्यामुळें, डॉ. आंबेडकरांचे लिखाण पाहिजे त्या प्रमाणांत प्रकाशीत झालेले नाही. वा बाबासाहेबांच्या लिखाणाला हवा तो न्याय मिळालेला नाही. *"बरेच प्रकाशीत काही खंडांच्या आवृत्ती संपलेल्या असल्याने / विकल्या गेल्यानंतर पुनश्च प्रकाशीतचं केल्या गेलेले नाहीत."*  मग काय...??? सदर समितीतील घोडे हे आपल्या घोडेखाण्यात, झोपलेले होते किंवा, गवत खात होते काय...????  हा तर संशोधनाचा विषय म्हणावा लागेल...!" आता पुन्हा सदर समितीवर त्याच *सुमार दर्जाची घोडे,"* सोडलेले असल्याने, पुनश्च समिती झोपते की धावते, ह्यावर सर्व आंबेडकरी लोकांच्या नजरा राहाणार आहेत...! *"मंत्री / संत्री / कुत्री ही नेहमी बदलतील ही...!"* परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सर्व लिखाण / संपलेल्या सर्व आवृत्यांचे पुनश्च नव्या जोमाने प्रकाशन, ह्या नव नियुक्त घोड्यांकडुन होईल, ह्या प्रतीतिक्षेतचं...!!! 


* * * * * * * * * * * * * * * * * * * * *



No comments:

Post a Comment