Sunday 11 April 2021

 👌 *बगिच्यात माझ्या बुध्दास बघुनी...!!!*

           *डाॅ. मिलिन्द जीवने 'शाक्य'* नागपूर १७

           मो. न. ९३७०९८४१३८


बगिच्यात माझ्या बुध्दास बघुनी, मोगरा बहरत गेला

विविध रंगी गुलाबाच्या संगे, तो सुगंध दरवळत गेला...


काट्याच्या ह्या जखमेतुन, माणुस दु:ख सहत गेला

व्यवस्थेच्या सरकारीकरणात, तो उध्वस्त होत गेला

बोलणा-या ह्या ओठातुन, शब्द घायल तो करत गेला

भीमाच्या त्या लेखणीतुन, बुध्दाकडे तो धावुन गेला...


स्वप्नाच्या जगतात ह्या, उंच आकाशी तो उडत गेला

खरे वास्तव विसरुन तो, जीवन उध्वस्त करत गेला

पक्ष्यांच्या थव्यांनी तेव्हा, पंख नाद हा सांगुन गेला

धम्म पथाचा आधार घेवुनी, तो सत्य समजुन गेला...


फुलपाखरांच्या त्या सौंदर्यात, स्वत:ला तो बघत गेला

फुलांच्या ही निष्पाप भावाने, प्रेमाच्या तो सोबत गेला

गुलाब शेवंती सदाफुली सोबत, मैत्री तो करुन गेला

ह्या प्रेमाचा अंकुरामधुनी, बुध्द वाणी तो समजुन गेला...


* * * * * * * * * * * * * * * * * * * * *




No comments:

Post a Comment