Friday, 1 November 2024

 👌 *बुद्ध दिगंतात किर्ती....!*

       *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*

       मो. न. ९३७०९८४१३८ 


ह्या सुगंंधी फुलांनी हवा साद घ्यावी

बुध्द दिगंतात किर्ती ही रुजुनी यावी...


तुफानातील दिवे ही पेटता जावी

आकाशी काळोख उजेडी व्हावी

ईर्षा क्रोधीतेला तिलांजली द्यावी

प्रेम मैत्रीची भावना हृदयी यावी...


ही वै-याची रात्र पार डुबुनी जावी

हर्ष किरणांची छाया मनास भावी

फुल कणांची मात्रा ही मधुर व्हावी

माणसा मनाला ही सुख मुद्रा यावी...


ह्या हुंकार भीमाची ती क्रांती यावी

झोपाळु मस्त शव ही उठुनी जावी

हक्क संघर्षां फुलांची उकल व्हावी

उद्याची पहाट ही महासुर्याची यावी...


****************************

नागपूर दिनांक ३१/१०/२०२४

No comments:

Post a Comment