✍️ *गोरे राज बरे आहे !*
*डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य*
मो. न. ९३७०९८४१३८'
स्वतंत्र भारताची दु:ख कहानी आहे
काळे इंग्रजा परी गोरे राज बरे आहे...
इथे वेदनांचा मोठा बाजार आहे
वेदना भाव तो कवडीमोल आहे
ग्राहकांची इथे ना ही वर्दळ आहे
तरीसुद्धा इथे बाजार भरतो आहे...
इथे खुले अंग प्रदर्शन भरत आहे
ग्राहकांचा बेड हा सजविला आहे
पैशासाठी सर्व काही गहाण आहे
माणसाची इज्जत ही निलाम आहे...
प्रेम मैत्री संगे ही दगाबाजी आहे
नव नविन मित्र ही सोबतीला आहे
शब्दांनी माणुस घायाळ होत आहे
हे अस्त्र शस्त्राची ना ही गरज आहे...
हा देश तर स्वतंत्र झालेला आहे
स्वैराचार इथे फार जोरावर आहे
ना ही इथे तं काही देशभक्ती आहे
नेता राजकिय दलाल झाला आहे...
--------------------------------------
नागपूर, दिनांक १८/११/२०२४
https://youtu.be/nJuZgqJYU3k?si=FTyvkuLADAnnxFSi
No comments:
Post a Comment