👌 *ही भीम साद आली !*
*डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'* नागपूर
मो. न. ९३७०९८४१
सुर्य मावळता अंधारी रात्र झाली
सुर्य उगवता ही भीम साद आली...
ही दु:खाची छाया दीन वर्गा आली
शोषित मना भुकेची सवय झाली
प्रेम मैत्रीची हाक ती हृदयी आली
मग क्रांती ज्वाला ही पेटता झाली...
ही अज्ञानाची नांगी शोषिता आली
विद्येची भुख साद ती चेतवता झाली
हक्क संघर्षाची ज्योती पेटुनी आली
हे शोषका समकक्ष ही प्रगती झाली...
तुझ्या प्रेमाची ती मला चाहुल आली
बुध्दाची चेतना ह्या जम्बुद्विपी झाली
उडणारी पंखे पुर्णत: तयारीत आली
हे असंख्य पाखरांची ही उड्डान झाली...
----------------------------------------
नागपूर, दिनांक १७/११/२०२४
No comments:
Post a Comment