Tuesday, 12 November 2024

 ✍️ *आंबेडकरी लोक कवि मधुकर गजभिये ह्यांची संघर्षमय जीवनी !*

      *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'* नागपूर १७

राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल 

एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु म प्र 

मो. न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२


           बुध्द आंबेडकरी साहित्य क्षेत्रात बरीच मोठी आणि साहित्यावर जबर पकड असणारी साहित्यिक आहेत. *मधुकर गजभिये* हे त्या साहित्य यादीमध्ये समावेश होणार नसले तरी, त्यांच्या आंबेडकरी बांधिलकी मन लिखाणाला दुर्लक्षीत करता येणार नाही.  मंगळवार दिनांक १२ नोव्हेंबर २०२४ ला मी काही कामानिमित्त *धर्मादाय सहआयुक्त* कार्यालयात गेलो. मला बघितल्यावर समता सैनिक दलाचे *राजकुमार वंजारी* ह्यांनी उभे होवुन, तेव्हा मला "जयभीम" घेतला. त्यांच्या सोबत कवि *मधुकर गजभिये* हे सुध्दा होते. राजकुमार वंजारी ह्यांनी मला कवि मधुकर गजभिये ह्यांचा परिचय करून दिला. तेव्हा मी राजकुमाराला म्हटले की, *मी मधुकर गजभिये ह्यांना ओळखतो. त्यांनी माझ्या ५० व्या वाढदिवसाला माझ्यावर एक गीत लिहुन गायिले होते. आणि ते गीत माझ्या जीवनावर प्रकाशीत स्मरणिकेत प्रकाशीत सुध्दा झाले आहे."* माझे हे शब्द ऐकताच कविवर्य मधुकर गजभिये ह्यांनी त्यांच्या शबनम बॅगेतुन एक छोटे पुस्तक *"आंबेडकरी लोक कविची संघर्षमय गाथा"* काढुन मला भेट दिले. आणि मी घरी आल्यावर सदर संघर्ष जीवन पुस्तक वाचले. तसे बघता आंबेडकरी समाजातील प्रत्येक व्यक्ती हा *"संघर्षमय जीवनातुन"* गेलेला आहे. तो जीवन संघर्ष विभिन्न ही असु शकतो. सदर पुस्तकामध्ये विशेष काही नाविण्यपूर्ण नसले तरी, *"आपली जीवन सत्यता"* मांडण्याची हिंम्मत ही मधुकर गजभिये ह्यांनी केलेली आहे. बरीचं माणसे ही चांगली घटना सांगतात. *"परंतु आपली गरिबी / आपले दोष / सत्यता ही लपवित असतात.* सत्य स्वीकारण्याची हिम्मत फार कमी लोकांमध्ये असते. सदर जीवन संघर्ष पुस्तकातील *"भाषा ही जरी खुप सशक्त नसली तरी साधी सरळ भाषा मांडणी"* ही मनाला विचार करण्यास ती बाध्य होते. सदर पुस्तकातील ब-याच लिखाण चुका सोडल्यास साधारण माणसाच्या जीवनाचे प्रतिबिंब तिथे दिसुन येते.

           *कवि मधुकर गजभिये* ह्यांनी माझ्या जन्मदिवसाला माझ्यावर गीत लिहून सदर गीत माझ्या सन्मान सोहळ्यात गायिले होते. आमचा मित्र आणि सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल ह्या माझ्या संघटनेचा राष्ट्रिय सचिव *सुर्यभान शेंडे* हा तर माझ्या प्रत्येक जन्म दिवसाला नविन नविन गीत गात असतो. *"सुर्यभान  शेंडे असो की मधुकर गजभिये"* ह्यांचा जीवन संघर्ष हा वेगळा नाही. प्रश्न आहे हा प्रामाणिक सामाजिक बांधिलकीचा / सत्य निष्ठेचा...! आम्ही ती कशी जोपासतो ? आम्ही समाज द्रोह हा करतो आहे काय ? आम्ही दगाबाजी करतो काय ? अशी बरीच प्रश्न आहेत. एकवेळ ह्या संदर्भात *"स्वार्थी भावनेतुन काही लाभ"* मिळण्याच्या प्रयत्न ही केला जात असेल. पण तो लाभ हा चिरकाली नसतो. तशी माणसे ही कधीचं सुखी / आनंदी जीवन जगु शकत नाही. *"माणसाचे सत्य मन हे डिवचत असते."* कदाचित क्षणिक आनंद प्राप्त होवु शकतो. परंतु जीवनातील कुठल्या तरी एका तरी वळणावर, तो खितपत पडलेला असतो. *"क्षमा मागण्याची वेळ ही पुर्णतः दुर निघुन गेलेली असते."* तसेच *"वेळ ही आपली एक परिक्षा आहे."* हे समजुन घेणे ही गरजेचे आहे. म्हणुन बुध्द वचन हे मला सहजपणे स्मरुन जाते. *"मनोपुब्बङ्गमा धम्मा मनोसेट्ठा मनोमया | मनसा चे पदुट्ठेन भासति चा करोति वा | ततोनं दु:क्खमन्वेति चक्कं व वहतो पदं ||* (अर्थात - सर्व ह्या प्रकारचे शारिरीक, वाचिक, मानसिक कर्म प्रथम मनात उत्पन्न होतात. मन हे सर्व इंद्रियांचे प्रमुख आहे. वा ते मनोमय आहे. जेव्हा व्यक्ती सदोष मनाद्वारे बोलत असतो, वा काम करीत असतो, तेव्हा तो व्यक्ती कष्ट, दु:ख हे अशाप्रकारे भोगत असतो, जसे बैलगाडी चे चाके हे बैलाच्या मागे मागे ते धावत असतात.) 

        जय भीम !!!


***************************

नागपूर, दिनांक १२ नोव्हेंबर २०२४

No comments:

Post a Comment