Tuesday, 29 October 2024

 🌹 *हे प्रेम मैत्री गंधाचा...!*

       *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*

       मो. न. ९३७०९८४१३८


हे प्रेम मैत्री गंधाचा गुलाब तु

बुध्द मनाचा नाद जोडीला तु...


पिडिलो असता ह्या गुहेत हे

गुलामीची ती जंजीर झेलली

भुक तहानलेल्या वेदनांना हे

प्रेमाचा घास हा चाखविला तु...


हरपलो कुटिल जाळ्यात हे

वेदनांचा भारी मारा झेलला

अश्रु फुलांच्या ह्या सोबतीने हे

शक्तीचा हात पुढे केलास तु...


निसर्गाच्या बागेत फिरतांना हे

हातात हात जीवनाचा आला

दु:खाच्या ह्या समुद्र किनारी हे

आलिंगना भाव हा दिलास तु...


*************************

नागपूर, दिनांक २२/१०/२०२४

No comments:

Post a Comment