Wednesday, 28 January 2026

 👌*हे करुणा सागर....!*

      *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*

      मो. न. ९३७०९८४१३८


हे करुणा सागर बुध्द बुद्ध आहे

भीम बाबांचाही तोचं नाद आहे...


प्रज्ञेचा वारसा हा रे बुध्दाचा आहे

हे सन्मानास शील दिलेस त्यांना

प्रेम मैत्री बंधुता नाद वदलासं तु

अंहिसा देवुन युद्ध हे सारले आहे...


अष्टांग मार्गाने माणुस घडला आहे

दिशा दिली रे कार्यकारण भावातुन

सत्यही वदले हे चार आर्य सत्याने

दहा पारमिता रे तु सांगितली आहे...


ह्या वारसा पंखातही ती शक्ती आहे

अरे उडण्याचा आम्हास ध्यास हवा

विश्वास हा रे आमच्या मनात यावा

प्रेमाचा अंकुर हा हृदयी वास आहे...


----------------------------------------

नागपूर दिनांक २९ जानेवारी २०२६

No comments:

Post a Comment